Skip to main content

Posts

कला, क्रीडा, पर्यटनालाअधिक चालना देणार : अदिती तटकरे

औरंगाबाद, दिनांक 9 :  औरंगाबादेतील कला, क्रीडा आणि पर्यटनाला अधिक चालना देऊन पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही आज उद्योग, क्रीडा, पर्यटन आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपट गृहात यशवंतराव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, एमजीएमचे अंकुशराव कदम, सत्कारमूर्ती सुमित्रा भावे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल,  चंद्रकांत कुलकर्णी, निलेश राऊत व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ऐतिहासिक औरंगाबादची ओळख जपण्यासाठी शहरातील दरवाजांचे संवर्धन,  वेरूळ महोत्सव या बाबींवर योग्य अंमलबजावणी करण्यात येईल. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याबरोबरच येथे कला, क्रीडा आणि...

सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवाराची निवड करा – बलदेव सिंह

☯️राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा ☯️नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद , दिनांक  25  : सर्वसमावेशक ,  नैतिकदृष्ट्या निवडणूक पार पाडण्यासाठी पारदर्शी ,  निर्भय वातावरणात मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न भारत निवडणूक आयोग करत असते. तरी मतदारांनी सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवारांची निवड करावी ,  असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज केले. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज  शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिंह होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ,  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ,   पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद ,  विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल ,...

विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्या : संदिपान भूमरे

सार्वजनिक बांधकाम ,‍  जलसंपदा विभागाचा घेतला आढावा औरंगाबाद ,  दिनांक  17  :  पैठण ,  औरंगाबादचे रस्ते खड्डेमुक्त  असावेत. त्याशिवाय अपूर्ण विकासकामे ,  रस्ते ,  पूल ,  आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत ,  दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांना आज दिल्या. सुभेदारी विश्रामगृहाच्या बैठक सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री.भूमरे बोलत होते.जिल्हा परिषद सदस्य विलास भूमरे ,  मुख्य अभियंता खंडेराव पाटील ,   अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे ,   कार्यकारी अभियंता  एस.एस. भगत ,  सहायक अभियंता राजेंद्र बोरकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ,  कंत्राटदार आदींची उपस्थिती होती. श्री. भूमरे म्हणाले ,  कंत्राटदारांनी दर्जेदार कामे करावीत. नागरिकांची गैरसोय होणार नाही ,  याची दक्षता घ्यावी. पैठण तालुक्यातील अपूर्ण विकासकामे नाथ षष्टीपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. वेळेत पूर्ण कामे न करणाऱ्या कंत्राट...

निर्भिड, परिणामकारकपणे वक्फ मंडळाने कार्य करावे -नवाब मलिक

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबादच्या राज्य वक्फ मंडळाने पारदर्शक, निर्भिड आणि परिणामकारकपणे कामकाज करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पानचक्की परिसरातील राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. मलिक बोलत होते. यावेळी मंडळाचे सहसचिव एस.सी.तडवी, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, कायदेविषयक सल्लागार डी. यू. मुल्ला, वित्त अधिकारी  एस. एस. अली कादरी आदींसह मंडळाच्या अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. बैठकीत वक्फ मंडळाची कार्यपध्दती, रचना आणि मंडळाची परिणामकारकता याबाबत श्री. मलिक यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. वक्फ मंडळ पूर्णत: संगणीकृत करण्याला प्राधान्य असावे, प्रलंबित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लवकरच मंडळातील सदस्य यांचे विहित मार्गाने नियुक्ती करण्यात येईल. मंडळाच्या कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही बैठकीत श्री. मलिक यांनी अधिका-यांना आश्वासित केले. ****

प्रजासत्ताक वर्धापन दिनाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी - रिता मैत्रेवार

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): प्रजासत्ताक वर्धापन दिनासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी संबंधित विभागाच्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी अधिकाऱ्यांना आज केल्या. प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्व तयारी आढावा बैठक श्रीमती मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार अश्विनी डमरे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत पोलीस आयुक्त, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य, परिवहन आदी विभागांचा सविस्तर बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचनाही संबंधित विभागांना श्रीमती मैत्रेवार यांनी केल्या. ****

मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य -नितीन गडकरी

 ‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो’चा थाटात समारोप  औरंगाबाद,दिनांक 12  -   मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य राहील. मराठवाड्यातील दुष्काळ, येथील अडचणी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन  परिवहन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटनेच्यावतीने (मसिआ) कलाग्राम येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2020 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विशेष सचिव तथा विकास आयुक्त राम मोहन मिश्रा, ‘मसिआ’चे  अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गडकरी म्हणाले, उद्योग उभा केल्यास संकट येतात. परंतु या संकटाला संधीत रुपांतरीत करावे. उद्योग वाढीसाठी उत्पादनाची गुणवत्ता राखावी. ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. वेळेचे महत्त्व ओळखावे, या बाबी  व्यवसायात प्राधान्याने विचारात घ्याव्यात...

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दिनांक १० – निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री. ठाकरे यांनी केली. यावेळी उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या वृक्षांमध्ये वाढ करून   निरनिराळ्या पक्ष्यांच्या अधिवासास पूरक   वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारका च्या   उभारणीवर भर द्यावा, असेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. श्री. ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्त...