औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): प्रजासत्ताक वर्धापन दिनासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी संबंधित विभागाच्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी अधिकाऱ्यांना आज केल्या.
प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्व तयारी आढावा बैठक श्रीमती मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार अश्विनी डमरे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत पोलीस आयुक्त, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य, परिवहन आदी विभागांचा सविस्तर बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचनाही संबंधित विभागांना श्रीमती मैत्रेवार यांनी केल्या.
****
Comments