Skip to main content

Posts

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून पिकांची पाहणी

औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पि...

जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कामांचे जिओ टॅगिंग करा - नवल किशोर राम

औरंगाबाद, दि.14 -   शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. अनुलोम संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तलावांचे कामे करण्यात यावीत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 201 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झालीत. तरी देखील संपूर्णत: जिओ टॅगिंग झालेले नाही. तरी जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयाकडून झालेल्या विहिर पुनर्भरण, लोकसहभागातील कामाचे जिओ टॅगिंग करावे. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये पारदर्शकता ठेवून इ-टेंडरिंगव्दारे कामे पार पाडावीत. झालेल्या कामाचा परिपूर्ती अहवाल तत्काळ कृषी कार्यालयाला कळवावा, असेह...

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – डॉ. गडप्पा

औरंगाबाद,दि. 8 - प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावीपणे अंमलवजावणीसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीमार्फत योग्य अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. तरीही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा घाटीचे प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी केले.           घाटीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात श्री. गडप्पा यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्ष-किरण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा शेटे, डॉ. घाटकर आदींची उपस्थिती होती.           डॉ. गडप्पा म्हणाले, सोनोग्राफी केंद्राने सोनोग्राफी करावयाच्या संदर्भात करावयाच्या सर्व नोंदी व्यवस्थित व अद्यावत ठेवाव्यात. सोनोग्राफी केंद्राकडून सोनोग्राफी होत नसेल तरीही नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच टूडीइको, सिटीस्कॅन आणि एमआरआयसाठी नोंदणी आवश्...

हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्रीपदी प्रा.सुरेश पुरींची निवड

                    औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.       आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५  साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आह...

जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते फेब्रुवारीच्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन

      औरंगाबाद,दि. 7 -जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री  प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रीय जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले. वाल्मी येथील जलनायक, जलयोद्धा उजळणी  प्रशिक्षण आणि चिंतनशिबिरात श्री. शिंदे यांनी लोकराज्य विशेषांकाचे  प्रकाशन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता  केंद्राचे आनंद पुसावळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती. फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकात साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. विविध तज्ज्ञांचे लेख यामध्ये समाविष्ट असून मलपृष्ठावर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेल...

जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच जलयुक्त शिवार अभियानाची परिपूर्ती - प्रा. राम शिंदे

औरंगाबाद,दि. 7 - देशात राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील या अभियानाची दखल घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र या अभियानाला जलसाक्षरतेची जोड आवश्यक असल्याने शासनाने जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रातूनच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण होणार असल्याचा विश्वास जलसंधाण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथील सभागृहात जलनायक, जलयोद्धा उजळणी प्रशिक्षण व चिंतन शिबिरात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह , आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक तथा मृद व जलसंधारणचे आयुक्त दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, उपायुक्त सूर्यकांत हजारे आदींची उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  आजपर्यंत ...

ग्राहक जागृती मोठ्याप्रमाणात करा - भारत कदम

औरंगाबाद,दि. 5 -ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्याचे कार्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन ग्राहक हक्कांचे संरक्षण, संवर्धन  करावे,   असे आवाहन  जिल्हा पुरवठा  अधिकारी तथा परिषदेचे सदस्य  सचिव डॉ. भारत कदम यांनी केले.  जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कदम बोलत होते. यावेळी परिषदेचे राधाकिशन भोसले, देवयानी भारस्वाडकर, राजेश मेहता, नानक वेदी , डॉ. जमादार, मीरा काथार, एस.सी. वसावे, एम.बी.काळे, रावसाहेब नाडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत ग्राहकाकरिता वस्तूंची उपलब्धता, गुणवत्ता, वस्तूचे दर, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा आदी समस्यांबाबत विचार विनिमय झाला. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन समाजातील विविध यंत्रणांकडून जिल्हा प्रशासनाला उपाययोजना सूचविण्यासाठी, शिफारस करण्यासाठी परिषदेतील सदस्यांनी कार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. कदम म्हणाले. त्याचबरोबर ग्राहकांचे हित जपण्यासाठी, ग्राहक संरक्षण (सुधारणा ) अधिनियमानुसार कार्यवा...