औरंगाबाद, दि.14 - शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार
अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करावे, अशा सूचना
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व
गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. यावेळी त्यांनी
अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.
अनुलोम संस्थेच्या सहकार्याने
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तलावांचे कामे करण्यात यावीत. सन
2016-17 मध्ये जिल्ह्यात 201 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झालीत. तरी देखील
संपूर्णत: जिओ टॅगिंग झालेले नाही. तरी जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयाकडून
झालेल्या विहिर पुनर्भरण, लोकसहभागातील कामाचे जिओ टॅगिंग करावे. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये
पारदर्शकता ठेवून इ-टेंडरिंगव्दारे कामे पार पाडावीत. झालेल्या कामाचा परिपूर्ती अहवाल
तत्काळ कृषी कार्यालयाला कळवावा, असेही श्री. राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
बैठकीस प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक
सोमय मुंडे, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. पडवळ,
जिल्हा परिषद, वन, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
******
Comments