औरंगाबाद,दि.7 -जलसंधारण
व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे आणि
राष्ट्रीय जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले.
वाल्मी येथील जलनायक, जलयोद्धा
उजळणी प्रशिक्षण आणि चिंतनशिबिरात श्री. शिंदे
यांनी लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे महासंचालक
दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे आनंद
पुसावळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद
चिलवंत आदींची उपस्थिती होती.
फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य
विशेषांकात साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.
विविध तज्ज्ञांचे लेख यामध्ये समाविष्ट असून मलपृष्ठावर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या
संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारीत महाराष्ट्राच्या
चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेले छायाचित्र देण्यात आलेले आहे.
Comments