Skip to main content

Posts

कौटुंबिक वाद मिटविण्यात मध्यस्थांची भूमिका बहुमोलाची - जिल्हा न्यायाधीश शिंदे

·           कौटुंबिक न्यायालयात  मध्यस्थ जागृती कार्यक्रम  औरंगाबाद, दि.6 (जिमाका )---- कौटुंबिक वादातून दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध दुरावल्या जातात. परंतु मध्यस्थांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने, तडजोडीने मिटवला जातो. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका उपयुक्त, महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी.एस.शिंदे यांनी आज सांगितले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित मध्यस्थ जागृती कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरूणा फरस्वाणी, न्यायाधीश एस.ए.मोरे यांची उपस्थिती होती. मध्यस्थांची भूमिका, प्रक्रिया, न्यायालयीन भूमिका, मध्यस्थांचे कार्य, यश आणि अपयश याबाबत सविस्तर माहिती श्री. शिंदे यांनी दिली. मध्यस्थ केंद्राच्या माध्यमातून जलदगतीने न्याय निवाडा होण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमती फरस्वाणी यांनी श्री. शिंदे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. छाया गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. पोर्णिमा जोशी यांनी केले. आभार ॲड.पद्मिनी मोदी यांनी मानले. कार्यक...

शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या विपणनाबरोबर गुणवत्तेचा आग्रह धरावा - हरिभाऊ बागडे

                                                                                                            दिनांक.5.1.2018 औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.                         अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदा...

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जानेवारी, 11 मार्च रोजी

     औरंगाबाद,दि.4-राज्यात सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जानेवारी 2018 व 11 मार्च 2018 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि तालुका स्तरीय यंत्रणेने लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्य करावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी श्री. घोलप यांनी  मोहिम अंमलबजावणी बाबत माहिती दिली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम.गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर, पल्स पोलिओ कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्वला भामरे, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.             जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांसह 2 हजार 204 बुथवर 3 लक्ष 21 हजार 372 संभाव्य लाभार्...

शरद पवारांवरील चव्हाण लिखित पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करावे-  डॉ. मनमोहन सिंग

              औरंगाबाद,दि.23- आदरणीय मित्र, उत्तम सहकारी, जगभरात कर्तृत्त्वाने राजकारणात ठसा उमटविणारे, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी पुढाकार घेणारे, देशासमोरील संकटे आदर्शवत पद्धतीने हाताळणारे  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट इनिग्मा’ या चरित्रात्मक पुस्तकाचे सर्वांनी वाचन करायलाच हवे, असे प्रतिपादन माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आज केले.  शहरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) च्या रुक्मिणी सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते. माजी कृषीमंत्री तथा पद्मविभूषण शरद पवार, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. सिंग म्हणाले, औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा नगरीत येऊन मला आनंद झाला. जुने मित्र शरद पवार यां...

सामाजिक न्याय चित्ररथाचे नवल किशोर राम यांच्याहस्ते उद्घाटन

       औरंगाबाद,दि.21-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले.           जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून श्री. राम यांनी उद्घाटन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनेची उद्दिष्टे आदींबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे ...

दुधड झाले शेततळ्यांचे गाव

पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल… '' मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ . पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे . विकासाचा भाग म्हणून   प्रत्येक अधिका - यांनी एक गाव दत्तक घ्यावे , असा त्यांनी प्रयोग केला . त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली . शेतक - यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत . सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा . दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक - यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा . शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच !  '' - डॉ . विजयक...

रोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही!

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतून जनतेत वृक्षप्रेमाची गोडी निर्माण झाली. पूर्वी झाड विकत घेऊन लावण्याचा जमाना नव्हता. परंतु आता शासन वृक्ष लागवड मोहीम जोमानं राबवित आहे. त्यात जनतेचा सहभागही भरभरुन मिळतो आहे. म्हणून तर यंदा उद्दीष्टपूर्तीच्या एक दिवस अगोदरच शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. परंतु या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असते, ती रोपवाटिकेची. अशाच एका औरंगाबादेतील रोपवाटिकेची भूषणावह अशी वाटचाल.     औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर असलेली पैठण रोडवरील पल्ल्वांकुर रोपवाटिका. अगदी संताजी पोलिस चौकीपासून अर्धा किलोमीटरवरील. सुहास वैद्य (वय, 58) यांची. केवळ 500 रुपयांवर सुरु केलेला त्यांचा रोपवाटिकाचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. रोपवाटिकेचे रुपांतर आता ‘ट्री मॉल’ (झाडांचा मॉल) मध्ये झालेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने या व्यवसायामध्ये शास्त्रशुद्धपणे रसही घेतलाय. सुहास वैद्य यांची सुकृत, संकेत दोन्ही मुलं कृषी पदवीधर, पत्नी सुनीता, वास्तूविषारद सून अभिधा त्यांना या कामात मदत करतात....