औरंगाबाद,दि.21-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून श्री. राम यांनी उद्घाटन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनेची उद्दिष्टे आदींबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
चित्ररथांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप, मिनी ट्रॅक्टर वाटप, औद्यागिक सहकारी संस्थांसाठी भाग-भांडवल कर्ज योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आदी योजनांबाबत या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गावागावांमध्ये प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. भुजबळ यांनी सांगितले.
****---****

Comments