Skip to main content

Posts

शरद पवारांवरील चव्हाण लिखित पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करावे-  डॉ. मनमोहन सिंग

              औरंगाबाद,दि.23- आदरणीय मित्र, उत्तम सहकारी, जगभरात कर्तृत्त्वाने राजकारणात ठसा उमटविणारे, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी पुढाकार घेणारे, देशासमोरील संकटे आदर्शवत पद्धतीने हाताळणारे  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट इनिग्मा’ या चरित्रात्मक पुस्तकाचे सर्वांनी वाचन करायलाच हवे, असे प्रतिपादन माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आज केले.  शहरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) च्या रुक्मिणी सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते. माजी कृषीमंत्री तथा पद्मविभूषण शरद पवार, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. सिंग म्हणाले, औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा नगरीत येऊन मला आनंद झाला. जुने मित्र शरद पवार यां...

सामाजिक न्याय चित्ररथाचे नवल किशोर राम यांच्याहस्ते उद्घाटन

       औरंगाबाद,दि.21-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले.           जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून श्री. राम यांनी उद्घाटन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनेची उद्दिष्टे आदींबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे ...

दुधड झाले शेततळ्यांचे गाव

पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल… '' मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ . पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे . विकासाचा भाग म्हणून   प्रत्येक अधिका - यांनी एक गाव दत्तक घ्यावे , असा त्यांनी प्रयोग केला . त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली . शेतक - यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत . सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा . दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक - यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा . शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच !  '' - डॉ . विजयक...

रोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही!

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतून जनतेत वृक्षप्रेमाची गोडी निर्माण झाली. पूर्वी झाड विकत घेऊन लावण्याचा जमाना नव्हता. परंतु आता शासन वृक्ष लागवड मोहीम जोमानं राबवित आहे. त्यात जनतेचा सहभागही भरभरुन मिळतो आहे. म्हणून तर यंदा उद्दीष्टपूर्तीच्या एक दिवस अगोदरच शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. परंतु या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असते, ती रोपवाटिकेची. अशाच एका औरंगाबादेतील रोपवाटिकेची भूषणावह अशी वाटचाल.     औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर असलेली पैठण रोडवरील पल्ल्वांकुर रोपवाटिका. अगदी संताजी पोलिस चौकीपासून अर्धा किलोमीटरवरील. सुहास वैद्य (वय, 58) यांची. केवळ 500 रुपयांवर सुरु केलेला त्यांचा रोपवाटिकाचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. रोपवाटिकेचे रुपांतर आता ‘ट्री मॉल’ (झाडांचा मॉल) मध्ये झालेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने या व्यवसायामध्ये शास्त्रशुद्धपणे रसही घेतलाय. सुहास वैद्य यांची सुकृत, संकेत दोन्ही मुलं कृषी पदवीधर, पत्नी सुनीता, वास्तूविषारद सून अभिधा त्यांना या कामात मदत करतात....

विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम

वेळ सकाळी 7 वा. स्थळ शहागंज परिसरातील महात्मा गांधी यांचा पुतळा. ध्येय शहराची साफसफाई. महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन, पुष्पार्पन, अभिवादन. त्यानंतर हातात झाडू घेऊन स्वत: विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर परिसरातील स्वच्छता, साफसफाई करतात. खरंच राज्यात असं पहिल्यांदाच घडत असेल, की शासनाचे सर्व कार्यालये एकाच दिवशी एकदाच शहरात अनोख्या पद्धतीनं नियोजनबद्ध्‍रित्या यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करतात. लोकंही या मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतात. स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार म...

स्वच्छता हीच राष्ट्रभक्ती

स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची. तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य, देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी   6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख.              अनादि कालापासून स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनीही स्वच्छतेला अग्रक्रम   देत असत. स्वच्छता आरोग्यदायी जीवनाची गुरूकिल्लीच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधी स्वत: स्वच्छतेला प्राधान्य देऊन नित्यनेमाने साफसफाई करत. त्यांच्या प्रेरणेतून इतरही गांधीजींचे अनुकरण करत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपला परिसर, ग्राम स्वत: स्वच्छ करत. संत गाडगेबाबाही स्वत: झाडू घेऊन आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत. स्वच्छतेबाबत जनजागृती   घडवत.           ...

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. याशिवायही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. युनेस्कोच्य...