Skip to main content

Posts

दुधड झाले शेततळ्यांचे गाव

पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल… '' मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ . पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे . विकासाचा भाग म्हणून   प्रत्येक अधिका - यांनी एक गाव दत्तक घ्यावे , असा त्यांनी प्रयोग केला . त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली . शेतक - यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत . सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा . दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक - यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा . शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच !  '' - डॉ . विजयक

रोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही!

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतून जनतेत वृक्षप्रेमाची गोडी निर्माण झाली. पूर्वी झाड विकत घेऊन लावण्याचा जमाना नव्हता. परंतु आता शासन वृक्ष लागवड मोहीम जोमानं राबवित आहे. त्यात जनतेचा सहभागही भरभरुन मिळतो आहे. म्हणून तर यंदा उद्दीष्टपूर्तीच्या एक दिवस अगोदरच शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. परंतु या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असते, ती रोपवाटिकेची. अशाच एका औरंगाबादेतील रोपवाटिकेची भूषणावह अशी वाटचाल.     औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर असलेली पैठण रोडवरील पल्ल्वांकुर रोपवाटिका. अगदी संताजी पोलिस चौकीपासून अर्धा किलोमीटरवरील. सुहास वैद्य (वय, 58) यांची. केवळ 500 रुपयांवर सुरु केलेला त्यांचा रोपवाटिकाचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. रोपवाटिकेचे रुपांतर आता ‘ट्री मॉल’ (झाडांचा मॉल) मध्ये झालेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने या व्यवसायामध्ये शास्त्रशुद्धपणे रसही घेतलाय. सुहास वैद्य यांची सुकृत, संकेत दोन्ही मुलं कृषी पदवीधर, पत्नी सुनीता, वास्तूविषारद सून अभिधा त्यांना या कामात मदत करतात. निसर्गाच

विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम

वेळ सकाळी 7 वा. स्थळ शहागंज परिसरातील महात्मा गांधी यांचा पुतळा. ध्येय शहराची साफसफाई. महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन, पुष्पार्पन, अभिवादन. त्यानंतर हातात झाडू घेऊन स्वत: विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर परिसरातील स्वच्छता, साफसफाई करतात. खरंच राज्यात असं पहिल्यांदाच घडत असेल, की शासनाचे सर्व कार्यालये एकाच दिवशी एकदाच शहरात अनोख्या पद्धतीनं नियोजनबद्ध्‍रित्या यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करतात. लोकंही या मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतात. स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार म

स्वच्छता हीच राष्ट्रभक्ती

स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची. तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य, देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी   6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख.              अनादि कालापासून स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनीही स्वच्छतेला अग्रक्रम   देत असत. स्वच्छता आरोग्यदायी जीवनाची गुरूकिल्लीच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधी स्वत: स्वच्छतेला प्राधान्य देऊन नित्यनेमाने साफसफाई करत. त्यांच्या प्रेरणेतून इतरही गांधीजींचे अनुकरण करत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपला परिसर, ग्राम स्वत: स्वच्छ करत. संत गाडगेबाबाही स्वत: झाडू घेऊन आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत. स्वच्छतेबाबत जनजागृती   घडवत.             तीन वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. याशिवायही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. युनेस्कोच्या जा

पर्यटन व्यवसायात ‘गाईड’ होण्याची सुवर्णसंधी

 पर्यटन व्यवसायात ‘गाईड’ होण्याची सुवर्णसंधी  टुरिस्ट गाईड व्यवसायात येण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई, नागपूर, औरंगाबाद व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 400 युवकांना उपलब्ध करून दिली आहे. दि. 10.09.2017 पर्यंत http://mtdc.mhpravesh.in  या संकेत स्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. या  व्यवसायावर प्रकाश टाकणारा हा लेख औरंगाबाद 52 दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक ,  सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात. इथल्या वास्तूकलांचा, इतिहासाचा अभ्यास करतात. संशोधन करतात. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावतात ते गाईड.   ‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण, सक्षम, च

आला पावसाळा… चला गौताळा !

दिनांक  19 जुलै 2017 अजिंठ्याच्या डोंगररांगात म्हणा,की सातमाळ्याच्या रांगात 260.61 चौ. किमीमध्ये गौताळा अभयारण्य आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं असं अरण्य. बिबट, हरिण, काळवीट, नीलगाय, सायळ इथे आढळतात. औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेलं गौताळा कन्नड तालुक्यात येतं. निसर्गसहलीसाठी भेट द्यावं असंच हे ठिकाण. डोंगरदऱ्यांच्या कपारातून वाट काढत, उंचावरुन कोसळणारे नयनरम्य धबधबे, उंचच उंच डोंगरे, तेही हिरवेगार… डोळ्याचे पारणंच फेडतात. पावसाळी पर्यटनासाठी एकदा तरी भेट द्यावं, असंच गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. कन्नडपासून केवळ 15 कि.मी. अंतरावरच अभयारण्य आहे. चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर असलेल्या फाट्यापासून सरळ गेल्यास गौताळ्याचे प्रवेशव्दार लागते. तिथे चौकी आहे. तिथून आत प्रवेश मिळतो. अभयारण्यात पायी, वाहनानेही फिरता येते. पर्यटकांसाठी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅक वन विभागाने तयार केलेत. पर्यावरण, निसर्गप्रेमींना, तरूणाईला आनंददायी, आल्हाददायक असाच अभयारण्याचा परिसर आहे. पावसा