दिनां क : 15.5.201 7 वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर ...