Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

वृक्ष लागवडची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्या - प्रशांत शेळके

औरंगाबाद,   दि.  21  –   राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती. सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात  औरंगाबाद जिल्ह्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व वि

करमाड अपघातातील जखमींची विधानसभा अध्यक्षांनी घेतली भेट

औरंगाबाद दि.20 - करमाड येथे कंटनेरमुळे झालेल्या वाहनांच्या अपघातातील सर्व जखमींची रुग्णालयात जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दि.19 रोजी  भेट घेतली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. डॉक्टरांनी रुग्णांवर करत असलेल्या उपचारांची विचारपूस केली.           करमाड येथे  दि.19 रोजी  आठवडी बाजार होता. औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने ट्रॅक्टर, पीकअपसह दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात एकूण 16 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ औरंगाबाद शहरातील धूत, एमआयटी, घाटी, श्रध्दा इस्पितळात हलविण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत असे करमाड पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री. कोळी यांनी सांगितले.           घाटी रुग्णालयात सचिन खरात (वय 35), काकासाहेब जाधव, नामदेव रंगभरे यांच्यावर उपचार सुरू आहेत असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, डॉ. बी.आर. सोनवणे यांनी विधासनभा अध्यक्ष श्री. बागडे यांना सांगितले. तसेच रुग्णांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.

मेकोरॉटला पाण्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणार - डॉ. पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद, दि. 20 –मेकोरॉट या इस्राईलच्या शासकीय कंपनीला आवश्यक असणारी पाण्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज इस्राईलच्या सदस्यांना दिली. विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत इस्राईलच्या डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राईलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांनी इस्राईल मधील पाण्याच्या मुल्यमापनाबाबत सविस्तररित्या सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. परिस्थिती बदल

कचऱ्याचे संकट मोठे, मात्र उपाय शक्य ! - नवल किशोर राम

औरंगाबाद,   दि.  13  –   औरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे शहरवासीय  हैराण झाले आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्यातून या समस्येवर सहजपणे तोडगा निघू शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे. कचऱ्याचे संकट मोठे असले तरी त्यावर प्रक्रिया करुन ते दूर करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.  शहरातील झोन क्र. 3 व 4  मधील कचरा विलगीकरण, प्रक्रिया याबाबतची प्रत्यक्ष पाहणी श्री. राम यांनी केली. प्रभाग क्र.4 मधील एन -12 याठिकाणी मनपाच्या जागेवरच कचऱ्याचे योग्यप्रकारे विलगीकरण , कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डयांचा सुयोग्य पद्धतीने व नियोजनपूर्वक वापर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे शहरातील इतर वॉर्डमध्ये अशाचप्रकारे कचरा विलगीकरण, खड्डयांच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकृतपणे मनपा कर्मचारी, स्वच्छक यांच्याकडे सुपूर्द करावा. त्याचबरेाबर जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही सूचवावे. झोन क्र.

उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - विनोद तावडे

➢ राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या तीन दिवसीय वारीला औरंगाबादेत सुरुवात ➢ उर्दू इ साहित्य ॲपचे विमोचन, 50 स्टॉल्समध्ये नवोपक्रम औरंगाबाद दि.10  - प्राचीन काळापासून उर्दू भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या देशालास्वातंत्र्य देताना स्वातंत्र्यसैनिकांनी इनक्लाब जिंदाबादचा नारा दिला. हा नारा देखील उर्दूत होता. आपल्या देशाची प्राचीनकाळापासून उर्दू भाषा आहे. या प्रेमळ व आदरयुक्त असलेल्या उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतअसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्कायपद्वारे संवाद साधताना शिक्षकांना सांगितले. विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १० ते १२ मार्च या कालावधीत“राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीचे" आयोजन केले आहे. या वारीच्या उद्घाटनानंतर श्री. तावडे बोलत होते. या वारीचेउद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, राज्य समन्वयक पिराजी पाटील, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजनाथखांडके, सहाय्यक शिक्षण उपसं

नाथषष्ठी यात्रा उत्सवाची कालाहंडी फोडून सांगता

संत एकनाथ, भानुदासाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला औरंगाबाद, दि.09  :  पैठण येथे सुरु झालेल्या संत एकनाथ षष्ठी सोहळ्याची आज सूर्यास्ताच्या समयी नाथसमाधी मंदिराच्या गाभाऱ्यात कालाष्टमीची दहीहंडी फोडून सांगता झाली.संत एकनाथ, संत भानुदास यांच्या वैष्णवांनी केलेल्या जयघोषात आज शुक्रवार दि.09 मार्च रोजी सायंकाळी मंदिर परिसर दुमदुमून गेला. नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्याहस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली. तत्पूर्वी रघुनाथबुवा महाराज गोसावी, तळेगावकर, पैठणकर, योगीराज महाराज गोसावी, रावसाहेब गोसावी  यांच्या पालखींचे आगमन झाले. पालखीच्या आगमनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. भाविकांनी पावली खेळून आनंद व्यक्त करत भानुदास, एकनाथ महाराजांचा जयजयकार केला. मंदिर परिसरात काला उत्सवात सहभागी होण्यासाठी आबाल वृद्धांसह, महिला भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. विविध भागातून आलेल्या भाविकांसह यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे,  नगराध्यक्ष सुरज लोळगे, रघुनाथ महाराज, योगीराज महाराज, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित महाराज

अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

  दिनां क : 8 . 3 .201 8 औरंगाबाद, दि. 8 – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शासनाने मुली व महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजना अंमलात आणली आहे. या  योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होत असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला, 11 ते 19 वयोगटातील शाळकरी मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले. उस्मानपुरा येथील भानुदास चव्हाण सभागृहात अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री. भापकर बोलत होते. ही योजना अत्यंत महत्तवाची आहे. बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता ॲपव्दारे सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात येऊन मागणीप्रमाणे सॅनिटरी नॅपकीन माफक दरात महिला बचत गट व्दारपोच करणार आहेत. महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या नाविन्यपूर्ण योजनेबद्दल शासनाचे अभिनंदन करायलाच हवे. महिला सक्षमीकरणासाठी मराठवाडा विभाग सदैव अग्रेसर आहे. 5 लाख युवक युवतींना पुढील काही दिवसात स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी, शेतकरी, बचत गट चळवळीला बळकटी आणण्यासाठी, उत्तम शिक्षण, र

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बजाज पाणी संवर्धन प्रकल्प टप्पा 2 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद,दि.04 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ झाला असून कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे केले. लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 262 कोटी रुपयांतून 1 लाख 50 हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲङ देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पर

Inspirational Tradition

Banjara community is popular for their traditional folk culture. They celebrate festival of colors very actively and lively. Their mother tongue is Gorboli or Gormati. They started to celebrate holi many years ago with lot of enthusiasm. On this occasion they come together and celebrate holi in differently but follows their tradition.When they come   together and they play songs. Pic Credit -https://goo.gl/HSajJG             They play folk dance which very different , everlasting experience for anyone who is celebrating holi and its motivate to other people to celebrate festival of colors. They sing lengi song and play dance around holi. This tradition/culture of banjara community has different place in indain culture.   After lengi song and dance all people goes to their leaders home and till late Night they play their games differently. The Lengi dancer is known as Gerihya.                 The uniqueness of this celebrations is that all people come together without any so