औरंगाबाद, दि. 13 – औरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्यातून या समस्येवर सहजपणे तोडगा निघू शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे. कचऱ्याचे संकट मोठे असले तरी त्यावर प्रक्रिया करुन ते दूर करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
शहरातील झोन क्र. 3 व 4 मधील कचरा विलगीकरण, प्रक्रिया याबाबतची प्रत्यक्ष पाहणी श्री. राम यांनी केली. प्रभाग क्र.4 मधील एन -12 याठिकाणी मनपाच्या जागेवरच कचऱ्याचे योग्यप्रकारे विलगीकरण , कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डयांचा सुयोग्य पद्धतीने व नियोजनपूर्वक वापर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे शहरातील इतर वॉर्डमध्ये अशाचप्रकारे कचरा विलगीकरण, खड्डयांच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकृतपणे मनपा कर्मचारी, स्वच्छक यांच्याकडे सुपूर्द करावा. त्याचबरेाबर जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही सूचवावे. झोन क्र. 4 मधील कचरा विल्हेवाट प्रक्रिया उत्तमप्रकाराची आहे त्याचपद्धतीने इतर वॉर्डमध्ये देखील अशा प्रकारे कचरा विलगीकरण व प्रक्रिया राबवावी, असे आवाहन श्री. राम यांनी केले. कंपोस्टींग खत निर्मिती देखील कचऱ्यापासून होत होत आहे.कंपोस्ट खत निर्मितीसाठी ओला कचरा खड्डयामध्ये टाकून खत तयार करण्यात येतो. यापासून कोणतेही प्रदूषण होत नाही. नागरिकांनी या प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री राम यांनी केले.
झोन क्र. 4 मध्ये प्रभाग 10 आणि 28 मध्ये 10 टन कचरा दररोज जमा होतो. त्यापैकी 5 टन कचऱ्याचे कंपोस्टिंग होते. सुका कचरा 2 टन जमा होतो. शिळ्या भाकरीचे 500 ते 600 किलो व 250 ते 300 किलो भंगाराचे वर्गीकरण दररोज केल्या जाते. दोन वर्षांपासून अशा प्रकारची कचऱ्यावर प्रक्रिया दररोज सातत्याने राबविल्या जाते. अशा प्रकारची कचऱ्यापासून शहरात प्रक्रिया राबविली जाते. 190 टन कंपोस्ट खत शेतकऱ्यांना मोफत स्वरुपात देण्यात आले आहे. आजही 250 टन कंपोस्ट खत निर्मिती होत असल्याचे यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक बी.जे. पाटील, वॉर्ड अधिकारी अजमद खान यांनी सांगितले. यावेळी कडुबा वाघमारे, मधुकर मस्के यांचीही उपस्थिती होती.
झोन क्र. 3 मधील सेंट्रल नाका येथे जिल्हाधिकारी एन.के.राम यांनी केलेल्या पाहणी दरम्यान मनपा बांधकाम अभियंता मोईन शेख यांना याठिकाणी तत्काळ खड्डे खोदून कचऱ्याची कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रिया राबवावी, असे आदेश श्री. राम यांनी दिले. यावेळी नगर विकास शाखेचे उदय टेकाळे, मनपा सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, वॉर्ड अधिकारी दीपक जोशी, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, स्वच्छता निरीक्षक लियाकत अली, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
Comments