➢ उर्दू इ साहित्य ॲपचे विमोचन, 50 स्टॉल्समध्ये नवोपक्रम
औरंगाबाद दि.10 - प्राचीन काळापासून उर्दू भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या देशालास्वातंत्र्य देताना स्वातंत्र्यसैनिकांनी इनक्लाब जिंदाबादचा नारा दिला. हा नारा देखील उर्दूत होता. आपल्या देशाची प्राचीनकाळापासून उर्दू भाषा आहे. या प्रेमळ व आदरयुक्त असलेल्या उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतअसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्कायपद्वारे संवाद साधताना शिक्षकांना सांगितले.
विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १० ते १२ मार्च या कालावधीत“राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीचे" आयोजन केले आहे. या वारीच्या उद्घाटनानंतर श्री. तावडे बोलत होते. या वारीचेउद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, राज्य समन्वयक पिराजी पाटील, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजनाथखांडके, सहाय्यक शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुभाष कांबळे, गजानन सुसर, मंत्रालयीन समनव्यक अंकुश बोबडे यांची उपस्थिती होती.
श्री. तावडे यांनी सरकारने राज्यातील 1300 शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताला प्रथमप्राधान्य दिले असल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर विविध शिक्षकांशी त्यांनी संवाद साधून शासन करत असलेल्याप्रयत्नाबाबत यावेळी माहिती दिली. उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन राबवत असलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनीमार्गदर्शन केले. त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यातील धामणगावच्या शिक्षक शेख सादिया अल्ताफ यांनी त्या शिकवतअसलेल्या शाळेचे वर्ग दहावीपर्यंत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी स्काइपद्वारे श्री. तावडे यांना केली. त्यावर श्री.तावडे यांनी येत्या पंधरा दिवसांत योग्य कार्यवाही पार पाडून या शाळेचे वर्ग दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, अशी ग्वाहीदिली. यावेळी नोकरभरती, यु डायस, उर्दू शिक्षणाला वाव, पाठयपुस्तके, संशोधनावर आधारित विविध विषयांबाबत श्री.तावडे यांच्याशी शिक्षकांनी संवाद साधला.
गुणवतेचा ध्यास प्रत्येक शिक्षकांनी घेऊन उर्दू भाषेला अधिक दर्जेदार बनवावे, असे आवाहन डॉ.भापकर यांनी केले.सर्व शिक्षकांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळा आदी उपक्रमातून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात सर्वांनी एकजुटीनेकार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी शिक्षणाला वारीचे स्वरूप प्राप्त करून दिलेआहे. मोठ्याप्रमाणात त्यामुळे शिक्षणाचा जागर होतो आहे, ही अभिमानाची बाब, असल्याचेही श्री. भापकर म्हणाले.
या उपक्रमात विविध विषय, घटक, संकल्पना यावर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचे ५० स्टॉल्स उभारलेआहेत. यात एकूण १७६ नवोपक्रमी व उपक्रमशील शिक्षक आपल्या शिक्षणविषयक साहित्य, नवोपक्रम पद्धतीचेसादरीकरण करणार आहेत. तर गुणवत्तापूर्ण शिक्षण,शिक्षणाची उपयोगिता, नवोपक्रम यावर चर्चा, त्याची प्रभावीअंमलबजावणी करण्याचा प्रयत्न वारीच्या माध्यमातून राहील, असेही भापकर म्हणाले.
श्रीमती डोनगावकर यांनीही यावेळी उर्दू भाषेचा वापर सर्वाधिक होतो. या भाषेतील गोडवा मनाला भावतो. याभाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. मगर यांनीही यावेळी विचार मांडले. कार्यक्रमातपहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उर्दू इ साहित्य मित्रा ॲपचे श्री. भापकर यांच्याहस्ते तसेच दीपप्रज्वलन आणि स्टॉलचेउद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे, शेख तौसिफ यांनी केले. आभारसूरजप्रसाद जयस्वाल यांनी मानले. या तीन दिवसीय वारीला राज्यभरातील १० हजार शिक्षक भेट देऊन अध्ययनअध्यापनाच्या विचारांचे,प्रगत तंत्रज्ञानाचे आदान प्रदानावर चर्चा करून अंगीकार करणार आहेत. एकूण ३ दिवसचालणाऱ्या या वारीत ३६ जिल्ह्यातून प्रत्येक दिनी किमान ३ हजार शिक्षक भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठीविविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यस्तरीय उर्दू शिक्षण वारीच्या यशस्वीतेसाठी अंकुश बोबडे,राजेशहिवाळे,श्री.लोहाडे आदिंसह विविध समित्यांचे सदस्य पुढाकार घेत आहेत.
Comments