Skip to main content

Posts

निर्भिड, परिणामकारकपणे वक्फ मंडळाने कार्य करावे -नवाब मलिक

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबादच्या राज्य वक्फ मंडळाने पारदर्शक, निर्भिड आणि परिणामकारकपणे कामकाज करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पानचक्की परिसरातील राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. मलिक बोलत होते. यावेळी मंडळाचे सहसचिव एस.सी.तडवी, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, कायदेविषयक सल्लागार डी. यू. मुल्ला, वित्त अधिकारी  एस. एस. अली कादरी आदींसह मंडळाच्या अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. बैठकीत वक्फ मंडळाची कार्यपध्दती, रचना आणि मंडळाची परिणामकारकता याबाबत श्री. मलिक यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. वक्फ मंडळ पूर्णत: संगणीकृत करण्याला प्राधान्य असावे, प्रलंबित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लवकरच मंडळातील सदस्य यांचे विहित मार्गाने नियुक्ती करण्यात येईल. मंडळाच्या कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही बैठकीत श्री. मलिक यांनी अधिका-यांना आश्वासित केले. ****

प्रजासत्ताक वर्धापन दिनाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी - रिता मैत्रेवार

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): प्रजासत्ताक वर्धापन दिनासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी संबंधित विभागाच्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी अधिकाऱ्यांना आज केल्या. प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्व तयारी आढावा बैठक श्रीमती मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार अश्विनी डमरे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत पोलीस आयुक्त, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य, परिवहन आदी विभागांचा सविस्तर बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचनाही संबंधित विभागांना श्रीमती मैत्रेवार यांनी केल्या. ****

मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य -नितीन गडकरी

 ‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो’चा थाटात समारोप  औरंगाबाद,दिनांक 12  -   मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य राहील. मराठवाड्यातील दुष्काळ, येथील अडचणी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन  परिवहन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटनेच्यावतीने (मसिआ) कलाग्राम येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2020 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विशेष सचिव तथा विकास आयुक्त राम मोहन मिश्रा, ‘मसिआ’चे  अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गडकरी म्हणाले, उद्योग उभा केल्यास संकट येतात. परंतु या संकटाला संधीत रुपांतरीत करावे. उद्योग वाढीसाठी उत्पादनाची गुणवत्ता राखावी. ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. वेळेचे महत्त्व ओळखावे, या बाबी  व्यवसायात प्राधान्याने विचारात घ्याव्यात...

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दिनांक १० – निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री. ठाकरे यांनी केली. यावेळी उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या वृक्षांमध्ये वाढ करून   निरनिराळ्या पक्ष्यांच्या अधिवासास पूरक   वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारका च्या   उभारणीवर भर द्यावा, असेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. श्री. ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्त...

औरंगाबादच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

👉   मुख्यमंत्र्यांनी घेतल्या औरंगाबादच्या समस्या जाणून औरंगाबाद,दिनांक ०९ :औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोक प्रतिनिधींना दिली.    विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक पार पडली. बैठकीस उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाषदेसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्रीसंदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, हरिभाऊ...

वारकऱ्यांचा मेळा, नाथ षष्ठीचा सोहळा!

नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता झाली. संत एकनाथांची महती वैष्णवांना आहेच. संत एकनाथांच्या कार्याची महती पुस्तकातून कळतेच, परंतु प्रत्यक्षातील अनुभूती त्याहून वेगळीच असते. यावेळीच्या नाथ षष्ठी सोहळ्याचा हा वृत्तांत… औरंगाबादहून पैठणच्या दिशेने आम्ही दुपारी दोन वाजता निघालो. काही दिंड्या औरंगाबादच्या दिशेने परतत होत्या. साडेतीनच्या सुमारास पैठणमध्ये पोहोचलो. काही दिंड्या मंदिर परिसरात होत्या. यावेळी सर्वाधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या होत्या. या दिंड्यातील वारकरी आपापल्या पालात दिसत होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलेला होता. यांच्यातून वाट काढत नाथांच्या दर्शनासाठी थेट मंदिराच्या मंडपात आम्ही प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या   पुजाऱ्यांनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं. नाथांचा प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. नाथांच्या थेट समाधी दर्शनाने आम्ही तर धन्य झालो. हा क्षण म्हणजे मौलिकच. त्याची तुलना कोणत्याही ऐश्वर्याशी होऊ शकत नाही. दर्शनानंतरची अनुभूती अवर्णनीयच. सूर्यास्तानंतर कालाहंडी फोडण्यापूर्वी नाथांचे वंशज रघुनाथ बुवा महाराज गोसावी यांची पालखी मंदिरात येते. नाथांच्या समाधी मंदिरास...

वृक्ष लागवडची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्या - प्रशांत शेळके

औरंगाबाद,   दि.  21  –   राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती. सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात  औरंगाबाद जिल्ह्याने करा...