Skip to main content

Posts

ग्राहक जागृती मोठ्याप्रमाणात करा - भारत कदम

औरंगाबाद,दि. 5 -ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्याचे कार्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन ग्राहक हक्कांचे संरक्षण, संवर्धन  करावे,   असे आवाहन  जिल्हा पुरवठा  अधिकारी तथा परिषदेचे सदस्य  सचिव डॉ. भारत कदम यांनी केले.  जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कदम बोलत होते. यावेळी परिषदेचे राधाकिशन भोसले, देवयानी भारस्वाडकर, राजेश मेहता, नानक वेदी , डॉ. जमादार, मीरा काथार, एस.सी. वसावे, एम.बी.काळे, रावसाहेब नाडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत ग्राहकाकरिता वस्तूंची उपलब्धता, गुणवत्ता, वस्तूचे दर, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा आदी समस्यांबाबत विचार विनिमय झाला. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन समाजातील विविध यंत्रणांकडून जिल्हा प्रशासनाला उपाययोजना सूचविण्यासाठी, शिफारस करण्यासाठी परिषदेतील सदस्यांनी कार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. कदम म्हणाले. त्याचबरोबर ग्राहकांचे हित जपण्यासाठी, ग्राहक संरक्षण (सुधारणा ) अधिनियमानुसार कार्यवाही  करण्यात यावी, असेही डॉ. कदम या

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा - अर्थमंत्री मुनगंटीवार

औरंगाबाद,दि. 5 -सुशिक्षित बेरोजगार, कल्पक उमदे तरुण, उद्योजकतेची आवड असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्स आणि घडी पुस्तिकेच्या विमोचनानंतर श्री. मुनगंटीवार बोलत होत. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब  कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार चंद्रकात खैरे, आमदार अतुल सावे , संजय शिरसाट, इम्तियाज जलिल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, माहिती व जनसंपर्क विभागाचे  प्रभारी संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मराठवाड्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  जिल्हयात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्

आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद, दि. 5  – औरंगाबाद विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय रुग्णालय, घाटीच्या सिटीस्कॅन यंत्रासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, रोजगार या मुलभूत सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आज सांगितले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2017-2018 च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घाटीतील आवश्यक उपचार साधनांपैकी एमआरआय यंत्रासाठी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. सुभेदारी विश्रामगृहाच्या  नूतनीकरणासाठी 3 कोटी, शासकीय दंत महाविद्यालयाकरीता 2 कोटी रु. तरतुदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, विभागीय क्रीडा संकुलाकरिता क्रीडा विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून प्रस्ताव सादर केल्यास क्रीडा खात्याकडून रु. 7 कोटींची तरतूद मार्चमधील पुरवणी मागण्यात मान्य करता येईल असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. शहरातील विस्तारीकरणाचा विचार करुन नागरिकांना करमणूक सार्वजनिक उद्यान आवश्यक असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितल

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा -पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण   औरंगाबाद, दि.26 :- भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे.  त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जनतेला उद्देशून डॉ.सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम

भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनाखाली देशाने केलेली प्रगती अभिमानास्पद - संचालक देवेंद्र भुजबळ

औरंगाबाद,  दि. 26  :- भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनखाली स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब आहे, घटनेने दिलेल्या मुल्यांमुळे देशाचा विकास होत असुन या प्रगतीच्या वाटेवर देशातील वंचित घटकांबरोबर महिला देखील आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संचालक श्री. भुजबळ बोलत होते. भारतीय घटनेने स्त्री -पुरुष समानतेचा अधिकार आपल्याला दिला. याद्वारे भारतामध्ये आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भरीव कामगिरी करुन आपला ठसा उमटवत आहे. वेगवेगळे घटक आज विकासाच्या वाटेवर जोमाने चालत आहे त्यामुळे 'राष्ट्र चिरायु होवो ' अशा शुभेच्छा श्री.भुजबळ यांनी दिल्या. सहायक संचालक डॉ.र

ॲट्रॉसिटी कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करा –मिलिंद भारंबे

         दिनां क : 25 . 1 .201 8 औरंगाबाद, दि. 25   -   समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांना बळी न पडता ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्यवाही पार पाडावी. तपासी अधिकारी यांना गुन्ह्यांच्या तपासात ॲट्रॉसिटी कार्यशाळेचा अतिशय चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी पोलिस अधिका-यांना मार्गदर्शन केले. महसूल प्रबोधिनी येथे औरंगाबादच्या परीक्षेत्रातील नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत दुस-या सत्रात ते बोलत होते. यावेळी नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह , नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज क्षीरसागर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जालना जिल्हा