Skip to main content

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा - अर्थमंत्री मुनगंटीवार


औरंगाबाद,दि.5-सुशिक्षित बेरोजगार, कल्पक उमदे तरुण, उद्योजकतेची आवड असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


 औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्स आणि घडी पुस्तिकेच्या विमोचनानंतर श्री. मुनगंटीवार बोलत होत. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब  कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार चंद्रकात खैरे, आमदार अतुल सावे , संजय शिरसाट, इम्तियाज जलिल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, माहिती व जनसंपर्क विभागाचे  प्रभारी संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मराठवाड्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 जिल्हयात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या छायाचित्रांसह सचित्र पद्धतीने फ्लेक्स तयार करण्यात आले आहेत. त्यासह प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेबाबत सविस्तर माहिती व्हावी, यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे शुभेच्छासंदेश  घडी पुस्तिकेत आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी असणाऱ्या अटी, कर्ज कसे मिळेल याबाबतची प्रक्रिया, आवश्यक दस्तावेज, कर्जाचे स्वरुप (तपशील) यांसह लाभार्थी ऋषिकेश बनकर, मिनाक्षी भोरगे, विजय बन्सवाल, विष्णू जाधव यांच्या   प्रतिक्रिया देखील घडीपुस्तिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

*******

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्...

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्ध...

नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा ध्यास घ्या - दुष्यंत आठवले

दिनां क : 15.5.201 7           वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर ...