Skip to main content

Posts

आले गणराय

विघ्न दूर करण्यासाठी आले गणराय ...  कोकणातला गणेशोत्सव अतिशय उत्साहाचा. गोव्यातही मोठ्याप्रमाणात तो साजरा होतोच.  माटोळीने विशेष आकर्षण त्या गणरायाचं दिसतं. बाप्पा विघ्नहर्त्या, आमचे विघ्न दूर कर, असे म्हणत सर्वच जण महाराष्ट्रासह देश- विदेशातील गणेश भक्त आज गणरायाची स्थापना करतात. विदर्भातही मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळं उत्सूक आहेत. काहीं नी आतापर्यंत गणेशाची स्थापना केलीय, तर आता रात्रीपर्यंत काही जण करतील, एकूणच या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा.   विदर्भातील अष्टविनाायकांपैकी एक असलेल्या केळझरचा वरद विनायक वर्ध्यातीलच, हे विशेष. वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यात टेकडीवर वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेली ही वरद विनायकाची मूर्ती आहे. अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य अशा परिसराने मनाला शांती मिळते.  जागृत गणेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. वरद विनायक, सिद्धीविनायक या नावाने या गणेशाला संबोधले जाते. केळझरला पांडवांनी वास्तव्य केल्याचेही पोथी वाड्मयात सांगितले आहे. भीमाने बकासुरास येथेच ठार केल्याचे बोलले जाते. श्रीरामचंद्राचे गुरू वसि...

पोळ्याचा सण

स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करु नका हो ... काल पोळा झाला. काही मित्रांनी सेल्फी,छायाचित्र एफबीवर पोस्ट केले. शेतक-यांचा हा सण सर्वांनीच आनंदाने साजरा केला, खूप चांगले वाटले. परंतु याठिकाणी एक अनुभव आपणा सर्वांशी शेअर करावा वाटतोय. घडले असे, की शेतक-यांची चिंता न करणा-यांना (विश्‍ोषत: पांढरपेशी समाजाला) अचानकच आमच्या सख्याचा (बैलजोडीचा) एवढा कळवळा आलेला पाहून आश्चर्य वाटले. वर्ध्याच्या माझ्या शासकीय निवासस्थानाशेजारी सायंकाळी सहा- सातच्या सुमारास आजूबाजूचे शेजारी बैलांचा शोध घे त होते. कारण बैलाला नैवेद्य दिल्याशिवाय या बैलांना घरी गिळायला मिळणार नव्हते. म्हणून यांचा बैलांचा शोध सुरू झाला. बैलांचा शोध काही लागेना. क्वार्टरमधे राहणारी पुरूष मंडळी बैलाच्या शोधात आजूबाजूला फिरत होती. शासकीय निवासस्थान असल्याकारणाने इथे दूरवर कास्‍तकरांचा/ शेतक-यांचा राहण्याचा संबंध नाही. मग आता बैल शोधण्याची मोठी पंचाइत. इकडे आमच्या माता-भगिनी हातात नैवेद्याचा ताट घेऊन आमच्या बैलराजाची वाट पाहत होत्या. पण आपला घरातील महत्त्वाचा सण सोडून बाहेर (सिव्हिल लाईनला) कोण कशाला शेतकरी जाणार... तरीही एक व्यावसा...

'स्‍वाईन फ्लू'ला घाबरु नका; काळजी घ्‍या !

            ‘ स्‍वाईन फ्लू ’ ने विदर्भासह राज्‍यात आढळून येतो आहे. 2009 पासून हा आजार सर्वत्र चर्चेला आला. आता तर नागपूर, अमरावती, वर्धा जिल्‍हयातही या आजाराने डोके वर काढावयास सुरुवात केलीय. परंतु या आजाराबाबत योग्‍य काळजी घेतल्‍यास या स्वाइन फ्लू पासून आपण इतर दूर राहू श‍कतो, हेही तितकेच खरे आहे. मग या आजाराबाबतही आपणास माहिती पण हवीच ना,  हा आजार एच 1 एन 1 या विषाणू मुळे होतो. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटया आदी लक्षणे या आजारात आढळतात. मात्र, याबाबत आपण घाबरून न जाता योग्य काळजी घेतली तरच निश्चितच या आजारावर आपण नियंत्रण ठेवता येते. आजार अतिजोखमीचा पाच वर्षांखालील विशेषत: एक वर्षखालील बालके, 65 वर्षांवरील जेष्‍ठ नागरिक, गरोदर माता, उच्‍च रक्‍तदाब किंवा इतर -हद्यरोगी, मधुमेहांचे रुग्‍ण, फुप्‍फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असणा-या व्‍यक्‍ती, चेतासंस्‍थेचे विकार असणा-या व्‍यक्‍ती, प्रतीकार शक्‍ती कमी झालेल्‍या व्‍यक्‍ती, दीर्घकाळ स्टीरॉईड औषधी घेणा-या यक्‍तींकरीता हा आजार अतिजोखमीचा ठरुन ...

विज्ञानयुगातील पितृमोक्ष अमावस्या

सौजन्य-http://images.jagran.com गडचिरोली               पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. सर्वांना ते मुखपाठ आहे. परंतु आज सर्वपितृमोक्ष अमावस्या असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कारणही तसंच आहे. सकाळी सकाळी वृत्तमानपत्रे हाती पडलीे आणि कळलं. पहिल्या पानावर उद्याचा अंक नाही. असं ठळकपणे सर्व वृत्तपत्राच्या अगदी सुरवातीला पाहिल्या कॉलममध्ये वाचकांसाठी सूचना होती. तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही पक्ष पंधरवाडयामुळे पक्षापक्षांचा मिलाप होत नाहीय. पिंडेला कावळा शिवत नाहीय, असं पाहायला, वाचायला मिळालं. त्यामुळे अमावस्याची धास्तीच मनात भरलेली. त्यातच जिल्ह्यात प्रशासनाला कलेक्टरांनी सुटी घोषित केलेली (आम्ही कामावर हजर होतो हं.. कलेक्टर साहेबांसह, कदाचित निवडणुकीमुळे म्हणा).             प्रशासनलाही पिढयान् पिढ्या चालत आलेला आदेश घोषित करावा लागतो (अन्यथा कर्मचा-यांच्या क्रयशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असते). माध्यमंही त्याच पठडीतली म्हणायला का हरकत आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहे...

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)