आजार अतिजोखमीचा
पाच
वर्षांखालील विशेषत: एक वर्षखालील बालके, 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, गरोदर
माता, उच्च रक्तदाब किंवा इतर -हद्यरोगी, मधुमेहांचे रुग्ण, फुप्फुस, यकृत,
मूत्रपिंडाचे आजार असणा-या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणा-या व्यक्ती,
प्रतीकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, दीर्घकाळ स्टीरॉईड औषधी घेणा-या यक्तींकरीता
हा आजार अतिजोखमीचा ठरुन गंभीर स्वरुप धारण करु शकतो.
डॉक्टरांचा सल्ला-
गर्दी टाळा
हा आजार श्वसन संस्थेच्या आजार आहे. रुग्णाच्या
सान्निध्यात आल्याने हा आजार होत असल्याने, तो टाळण्यासाठी नागरिकांनी वारंवार
साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या
यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे. पुरेशी
झोप,विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. खोकलतांना, शिंकताना तोंडासमोर
हातरुमालाचा वापर करावा. हस्तांदोलन करणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये. फ्लू सदृश्य लक्षणे दिसत असतील तर
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणेही आवश्यक
आहे.
शाळा व
शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
ज्या उपक्रमात, कार्यक्रमात
विद्यार्थी मोठयाप्रमाणात एकत्र येतील, असे उपक्रम शक्यतो टाळावेत. जेणेकरुन
संसर्गाचा प्रसार रोखता येईल. वर्ग सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांत फ्लूच्या
लक्षणांनी कोणी ग्रस्त नाही याची पाहणी करावी. फ्लूची लक्षणे आढळलेल्या
विद्यार्थ्यांना सात दिवस विश्रांती व
जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा. लक्षणांची तीव्रता वाढल्यास वा प्रकृतीत
बिघाड आढळून येत आल्यास त्वरीत नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेला कळवावे.
वैद्यकीय अधिका-यांचा सल्ला पाळा
ज्या विद्यार्थी, शिक्षक आणि
इतर कर्मचा-यांना वैद्यकीय अधिकारी यांनी सात दिवस घरी राहण्याचा सल्ला दिला आहे
त्यांनी वैद्यकीय देखरेखखाली उपचार घ्यावेत, जनसंपर्क टाळावा. खोकताना वा
शिंकताना तोंडावर हातरुमाल व टिश्यू पेपरचा वापर करावा. वापरलेले टिश्यू पेपर स्वतंत्र
प्लास्टिक बॅगमध्ये टाकावेत. तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
यंत्रणा सज्ज,
आरोग्य विभागाचे आवाहन
नागरिकांनी स्वाईन फ्लू या
आजाराची भीती बाळगू नये, योग्य काळजी घेतल्यास हा आजार सहज टाळता येऊ शकतो. फ्लूची
लक्षणे आढळल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा. आपल्या जवळच्या
आरोग्य कर्मचा-यांनाही त्याची माहिती द्यावे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी
वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज आहे, याचाही नागरिकांनी लाभ घ्यायलाच
हवा, असे आवाहनही जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
काय करावे आणि
काय करु नये
Ø रुग्ण्याच्या संपर्कानंतर
हात साबणांने स्वच्छ धुवावेत.
Ø घरातील हवा मोकळी राहील याची
दक्षता घ्यावी.
त्या
साठी खिडक्या उघडया ठेवाव्यात.
Ø आरोग्यदायी सवयीचं कटाक्षानं
पालन करावे.
Ø आपले नाक व तोंड रुमालानी
झाकावे.
शिंक
आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर
झाल्यावर टिशू फेकून द्यावा.
Ø गर्दीच्या ठिकाणी मास्कचा
वापर करावा.
Ø ज्यांना श्वसनाचे आजार आहे
त्यांचीशी संपर्क टाळावा.
Ø भरपूर झोप घ्या आणि द्रव्य
पदार्थाचे जास्तीत-जास्त सेवन करा आणि पौष्टिक
आहार घ्या.
Ø आपण आजारी असाल तर घरीच
रहावे. जर शक्य असेल तर आपल्या शाळा,व्यवसाय यांपासून दुर रहावे.
Ø आपले हात साबण व स्वच्छ
पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ
काढल्यानंतर)
नियमित
धूवावेत.
Ø आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
Ø तुम्हाला सर्दी, खोकला या पैकी काही लक्षणे आढळल्यास प्रवास
टाळा.
-
श्याम टरके, वर्धा
Comments