राष्ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी आम्ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्ही.... म्हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील, संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई, शाळकरी मुलं-मुली, शिक्षक, नवदांपत्य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्त करून जातो, ही इथं आल्यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्याची सोयही उत्तम आहे. जेवणाचीही व्यवस्था आहे, अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत, तेही चविष्ट. उन्हाळयात तर याठिकाणी प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी, असं हे नयनरम्य असं ठिकाण आहे. (व्हीडिओ सौजन्यः चंद्रकांत पाटील)
दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’ अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप आणि आई व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे, शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक तसा हा परिसर म्...
Comments