Skip to main content

Posts

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दिनांक १० – निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री. ठाकरे यांनी केली. यावेळी उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या वृक्षांमध्ये वाढ करून   निरनिराळ्या पक्ष्यांच्या अधिवासास पूरक   वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारका च्या   उभारणीवर भर द्यावा, असेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. श्री. ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्तूविशारद धीरज द

औरंगाबादच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

👉   मुख्यमंत्र्यांनी घेतल्या औरंगाबादच्या समस्या जाणून औरंगाबाद,दिनांक ०९ :औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोक प्रतिनिधींना दिली.    विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक पार पडली. बैठकीस उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाषदेसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्रीसंदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशां

वारकऱ्यांचा मेळा, नाथ षष्ठीचा सोहळा!

नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता झाली. संत एकनाथांची महती वैष्णवांना आहेच. संत एकनाथांच्या कार्याची महती पुस्तकातून कळतेच, परंतु प्रत्यक्षातील अनुभूती त्याहून वेगळीच असते. यावेळीच्या नाथ षष्ठी सोहळ्याचा हा वृत्तांत… औरंगाबादहून पैठणच्या दिशेने आम्ही दुपारी दोन वाजता निघालो. काही दिंड्या औरंगाबादच्या दिशेने परतत होत्या. साडेतीनच्या सुमारास पैठणमध्ये पोहोचलो. काही दिंड्या मंदिर परिसरात होत्या. यावेळी सर्वाधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या होत्या. या दिंड्यातील वारकरी आपापल्या पालात दिसत होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलेला होता. यांच्यातून वाट काढत नाथांच्या दर्शनासाठी थेट मंदिराच्या मंडपात आम्ही प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या   पुजाऱ्यांनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं. नाथांचा प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. नाथांच्या थेट समाधी दर्शनाने आम्ही तर धन्य झालो. हा क्षण म्हणजे मौलिकच. त्याची तुलना कोणत्याही ऐश्वर्याशी होऊ शकत नाही. दर्शनानंतरची अनुभूती अवर्णनीयच. सूर्यास्तानंतर कालाहंडी फोडण्यापूर्वी नाथांचे वंशज रघुनाथ बुवा महाराज गोसावी यांची पालखी मंदिरात येते. नाथांच्या समाधी मंदिरासमोर

वृक्ष लागवडची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्या - प्रशांत शेळके

औरंगाबाद,   दि.  21  –   राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती. सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात  औरंगाबाद जिल्ह्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व वि

करमाड अपघातातील जखमींची विधानसभा अध्यक्षांनी घेतली भेट

औरंगाबाद दि.20 - करमाड येथे कंटनेरमुळे झालेल्या वाहनांच्या अपघातातील सर्व जखमींची रुग्णालयात जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दि.19 रोजी  भेट घेतली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. डॉक्टरांनी रुग्णांवर करत असलेल्या उपचारांची विचारपूस केली.           करमाड येथे  दि.19 रोजी  आठवडी बाजार होता. औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने ट्रॅक्टर, पीकअपसह दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात एकूण 16 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ औरंगाबाद शहरातील धूत, एमआयटी, घाटी, श्रध्दा इस्पितळात हलविण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत असे करमाड पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री. कोळी यांनी सांगितले.           घाटी रुग्णालयात सचिन खरात (वय 35), काकासाहेब जाधव, नामदेव रंगभरे यांच्यावर उपचार सुरू आहेत असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, डॉ. बी.आर. सोनवणे यांनी विधासनभा अध्यक्ष श्री. बागडे यांना सांगितले. तसेच रुग्णांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.

मेकोरॉटला पाण्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणार - डॉ. पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद, दि. 20 –मेकोरॉट या इस्राईलच्या शासकीय कंपनीला आवश्यक असणारी पाण्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज इस्राईलच्या सदस्यांना दिली. विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत इस्राईलच्या डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राईलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांनी इस्राईल मधील पाण्याच्या मुल्यमापनाबाबत सविस्तररित्या सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. परिस्थिती बदल

कचऱ्याचे संकट मोठे, मात्र उपाय शक्य ! - नवल किशोर राम

औरंगाबाद,   दि.  13  –   औरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे शहरवासीय  हैराण झाले आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्यातून या समस्येवर सहजपणे तोडगा निघू शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे. कचऱ्याचे संकट मोठे असले तरी त्यावर प्रक्रिया करुन ते दूर करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.  शहरातील झोन क्र. 3 व 4  मधील कचरा विलगीकरण, प्रक्रिया याबाबतची प्रत्यक्ष पाहणी श्री. राम यांनी केली. प्रभाग क्र.4 मधील एन -12 याठिकाणी मनपाच्या जागेवरच कचऱ्याचे योग्यप्रकारे विलगीकरण , कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डयांचा सुयोग्य पद्धतीने व नियोजनपूर्वक वापर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे शहरातील इतर वॉर्डमध्ये अशाचप्रकारे कचरा विलगीकरण, खड्डयांच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकृतपणे मनपा कर्मचारी, स्वच्छक यांच्याकडे सुपूर्द करावा. त्याचबरेाबर जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही सूचवावे. झोन क्र.