Skip to main content

Posts

एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी

                औरंगाबाद,दि.23  –एड्समुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. रुग्णालयातील एड्स तपासणी कीटसाठी आवश्यक उपकरणाकरीता,माहिती, शिक्षण आणि संवादाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत श्री. राम बोलत होते. जिल्ह्यातील आयसीटीसी, डापकु व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एड्स तपासणी कीट ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा. माहिती, शिक्षण आणि संवादावरही भर देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी देखील प्रस्ताव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम   यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.             सुरुवातीला जिल्हा शल्...

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी इज्तेमा सोहळ्याची केली पाहणी

औरंगाबाद,दि. 23 –लिंबे जळगाव येथे दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इज्तेमा सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी करुन येथील भाविकांशी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दि. 22 रोजी संवाद साधला.   यावेळी इज्तेमा आयोजन समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अतुल सावे, एकनाथ जाधव, राजू बागडे, हाजी मोहम्मद, एजाज देशमुख, आयोजन समितीचे डॉ. रियाज शेख, आयेशा खान, अतिक खान यांची उपस्थिती होती. कारी शकील, आमीर साहब, जुबेर मोतीवाला, लिंबेगावचे सरपंच अनिक अमिर पटेल आदींसह बाहेरुन आलेल्या धर्मगुरु, भाविकांशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोयीसुविधांची देखील श्री. लोणीकर यांनी यावेळी पाहणी केली. ******

मुदत द्या, नक्कीच कायमस्वरूपी प्रश्न सोडवू -डॉ. दीपक सावंत

नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी खासदार चंद्रकांत खै...

समाजाचा सर्वांगीण विकास साधा - महादेव जानकर

Ø राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा औरंगाबादेत   शुभारंभ Ø देशातील पहिली योजना, भविष्यात 1 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ औरंगाबाद,दि. 17   – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहा मुख्य घटकांसह सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज औरंगाबादेतून होत असल्याने आनंद वाटतो, असे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतकरी, मेंढपाळ, मजुर आदींच्या पाल्यांनी नियमित अभ्यास करावा. कष्टाने महत्त्वाच्या सर्वोच्च पदांवर पोहचवून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.    पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत आयोजित राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ व शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनविणाऱ्या फिड मिलच्या उद्घाटनप्रसंगी श्री जानकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आयुक्त कांतीलाल ...

उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता - उद्योगमंत्री देसाई

औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.   पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी    कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये   श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे   प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमा...

लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी - सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती   हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झो डे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक   उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी   नावलौकिक प्राप्त केला. लघु उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्...

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून पिकांची पाहणी

औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पि...