Skip to main content

Posts

तान्हा पोळा

सिंधी रेल्वे येथील तान्हा पोळा.

आरोग्‍यं धन संपदा ...

आरोग्‍य हीच आपली संपत्‍ती आरोग्‍याची काळजी प्रत्‍येकाने घ्‍यावी ती घेणे गरजेचेच आहे. म्‍हणून तर सर सलाम तर पगडी पचास... असं म्‍हटल जातं. आपल्‍या आरोग्‍यात बिघाड झाला तर आरोग्‍य यंत्रणा आहेतच. जिल्‍ह्यातील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि तेथे रुग्‍णांना मिळत असलेल्‍या लोकोपयोगी अशा योजना  व कार्यक्रमांची माहिती घेणारा हा आढावा.... https://commons.wikimedia.org                आरोग्यं धन संपदा असं म्‍हटलं जातं. मानवाच्‍या  उत्‍पत्‍तीपासूनच मानव आरोग्‍याची त्‍याला जमेल तशी काळजी घेतो. पूर्वी आयुर्वेदाचा आधाराने आजारावर उपचार होत. वैद्य जडीबुटी देऊन आजारी व्‍यक्‍तीला नीट  करत. काळ बदलला आज 21 व्‍या शतकात मानव वाटचाल करीत आहे. युगानुरुप आरोग्‍य सुविधेत आमुलाग्र बदल झाले. विज्ञानाने प्रगती साधली . असाध्‍य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. वर्धा जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेने रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा मानून येथील जनतेची निःस्‍वार्थपणे , योग्‍य व यथोचितरीत्‍या सेवा केली, करत आहेत ते येथील कर्तव्‍य तत्‍...

सरकारचा पहिला निर्णय : सेवेची हमी आणि अंमलबजावणी

सरकारचा पहिला निर्णय : सेवेची हमी आणि अंमलबजावणी           स रकारी काम आणि सहा महिने थांब , असं उपरोधानं बोलल्या जायचं . पण आता अशी परिस्थिती राहलेली नाही ; कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा हमी विधेयक लागू करणार असल्याचं पहिलं आश्वासन त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जनतेला दिलं , अन् ते लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणी करून पूर्णही केलं . आता सामान्य नागरिकांना सरकारी उंबरठे झिजवण्याची गरज नाही . सेवा , सेवेचा कालावधी ; त्यासंबंधित सरकारी जबाबदारी या अधिनियमामुळे निश्चित झाली . योग्य वेळेत सेवा दिली नाही . तर कसूरदार अधिका - यांवर किमान पाचशे ते पाच हजार रूपयांपर्यंतची शास्ती करण्यात आलेली आहे . त्यामुळे आता सामान्यांना वेळेत सेवा मिळण्याचा हक्क लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीतून मिळण्यास सुरूवात झालेली आहे .               सरकारी कार्यालयातील स्थिती अ...
शाश्वत पाण्याचा आधार... जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाची, महत्त्वाकांक्षी आणि कमालीची अशी सर्वांच्याच उपयोगाची महत्त्वपूर्ण अशी योजना. ही योजना आता योजना राहिली नसून लोकचळवळ बनली आहे. वर्धा जिल्ह्यातील 214 गावांमध्ये अभियानांतर्गत कामे झाली. आता केवळ 205 कामे शिल्लक आहेत; तीही प्रगतीपथावर आहेत. एकूणच लोकचळवळीतून जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून गावच्या शिवारातील पाणी गावात साठवून भूजल पातळीत वाढ होते आहे. जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तयार केलेली ही योजना राज्यासह जिल्ह्याला अधिकच लाभदायी ठरली आहे. आता ही योजना शेतीसाठी शाश्वत असा आधारच आहे.  जलयुक्त शिवार अभियानाने शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून दिले. शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात जलसंधारण, लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट नालाबांध, खोलीकरण, साखळी सिमेंट नालाबांध, कृषी विभागाकडून नालाखोलीकरण व ढाळीचे बांध, सामाजिक वनीकरणकडून झाडांची ...

आले गणराय

विघ्न दूर करण्यासाठी आले गणराय ...  कोकणातला गणेशोत्सव अतिशय उत्साहाचा. गोव्यातही मोठ्याप्रमाणात तो साजरा होतोच.  माटोळीने विशेष आकर्षण त्या गणरायाचं दिसतं. बाप्पा विघ्नहर्त्या, आमचे विघ्न दूर कर, असे म्हणत सर्वच जण महाराष्ट्रासह देश- विदेशातील गणेश भक्त आज गणरायाची स्थापना करतात. विदर्भातही मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळं उत्सूक आहेत. काहीं नी आतापर्यंत गणेशाची स्थापना केलीय, तर आता रात्रीपर्यंत काही जण करतील, एकूणच या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा.   विदर्भातील अष्टविनाायकांपैकी एक असलेल्या केळझरचा वरद विनायक वर्ध्यातीलच, हे विशेष. वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यात टेकडीवर वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेली ही वरद विनायकाची मूर्ती आहे. अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य अशा परिसराने मनाला शांती मिळते.  जागृत गणेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. वरद विनायक, सिद्धीविनायक या नावाने या गणेशाला संबोधले जाते. केळझरला पांडवांनी वास्तव्य केल्याचेही पोथी वाड्मयात सांगितले आहे. भीमाने बकासुरास येथेच ठार केल्याचे बोलले जाते. श्रीरामचंद्राचे गुरू वसि...