आरोग्य
हीच आपली संपत्ती आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी ती घेणे गरजेचेच आहे.
म्हणून तर सर सलाम तर पगडी पचास... असं म्हटल जातं. आपल्या आरोग्यात बिघाड
झाला तर आरोग्य यंत्रणा आहेतच. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तेथे
रुग्णांना मिळत असलेल्या लोकोपयोगी अशा योजना व कार्यक्रमांची माहिती घेणारा हा आढावा....
https://commons.wikimedia.org |
आरोग्यं धन संपदा असं म्हटलं जातं. मानवाच्या उत्पत्तीपासूनच मानव आरोग्याची त्याला जमेल
तशी काळजी घेतो. पूर्वी आयुर्वेदाचा आधाराने आजारावर उपचार होत. वैद्य जडीबुटी
देऊन आजारी व्यक्तीला नीट करत. काळ
बदलला आज 21 व्या शतकात मानव वाटचाल करीत आहे. युगानुरुप आरोग्य सुविधेत आमुलाग्र
बदल झाले. विज्ञानाने प्रगती साधली. असाध्य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. वर्धा जिल्ह्यातील आरोग्य
यंत्रणेने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून येथील जनतेची निःस्वार्थपणे, योग्य व यथोचितरीत्या सेवा केली, करत आहेत ते येथील कर्तव्य तत्पर असे शल्यचिकित्सक, वैद्यकीय तज्ञ, अधिकारी, पारिचारिका यांच्या दैनंदिन कार्यावरुन लक्षात येते.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पूर्वीचे
नाव के.ई.एम रुग्णालय. सुरुवातीला 200 खाटांचे हे रुग्णालय. 1995 मध्ये याचे विस्तारीकरण
होऊन 286 खाट रुग्णांकरीता उपलब्ध झाले. जिल्हाभरातील रुग्णांचा विश्वासाने
रुग्णालयाकडे वाढणारा कल पाहून सद्यस्थितीत 315 खाटांची याठिकाणी व्यवस्था आहे.
जिल्ह्यातील जवळपास 14 लाख लोकांना जिल्ह्यात 256 आरोग्य संस्था तपासणी व
उपचारासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सेवाग्रामच्या कस्तूरबा हेल्थ सोसायटी व सांवगी
मेघे येथील जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाचा विशेष उल्लेख करावा
लागेल.
दर्जेदार, गुणवत्तापूर्ण अशा सेवा
पुरविण्याकारीता जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स सदैव तत्पर असतात. प्रशासकीय
यंत्रणांनी देखील रुग्णालयात रुग्ण, नातेवाईकांना शासनाच्या आरोग्य सुविधेचा
लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी औषधी , शल्यचिकित्सा, स्त्री रोग, बाल रोग
या विभागाच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होत्या. आता अतिदक्षता कक्ष, ट्रॉमा केअर
सेंटर (अद्ययावत अपघात विभाग)
सोनोग्राफी या सेवा महाराष्ट्र आरोग्य विकास यंत्रणा कार्यक्रमांतर्गत सुरु करण्यात
आलेल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य
योजना, मानसिक आरोग्य कार्यक्रम, आयुष, गर्भलिंग निदान चाचणी,
टेलि मेडीसिन, डायलॅसिस (रक्त शुद्धीकरण), सिटीस्कॅन आदी विभागांव्दारे गोरगरीब व गरजू रुग्णांना अविरतपणे येथे
सेवा पुरविण्यात येते आहे.
सामान्य रुग्णालयामध्ये सर्व सोयींयुक्त
अशी अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिका, रक्तपेढी व रक्त घटक विलगीकरण कक्ष, रुग्ण्वाहिका सेवा ( टोल फ्री .102, 108) स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र असा जळीत कक्ष,
प्रसूती व प्रसूती पश्चात कक्ष, अतिजोखमीचे नवजात बालक उपचार कक्ष, शेतकरी आत्महत्या
प्रतिबंध करण्यासाठी, मानसिक आरोग्य कार्यक्रम, मधुमेह, उच्च रक्तदाब, लकवा व
कर्करोगाकरीता राष्ट्रीय असंसर्गजन्य
रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कर्णबधीर
नियंत्रण कार्यक्रम, जननी सुरक्षा
कार्यक्रम व सुरक्षित मातृत्व कार्यक्रम ( टोल फ्री क्रमांक 102) ,
जीवन अमृत सेवा योजना ( टोल फ्री क्रमांक 104) आयुष विभाग या रुग्णालयात
24 तास या सेवा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात बाह्य औषधी चिठ्ठी मुक्त
दवाखाना ही योजना 1 ऑगस्ट 2013 पासून राबविण्यात येते आहे. या योजनेतंर्गत रुग्णालयाबाहेरुन
कोणत्याही प्रकारची औषध विकत आणण्याची आवश्यकता नाही. याबाबत तक्रार असल्यास
दूरध्वनी क्रमांक 104 वर संपर्क साधता येतो.
विशिष्ट आरोग्य
कार्यक्रम
राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा
कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची डॉक्टरांच्या विशेष पथकाव्दारे
अंगणवाडी व शाळा याची आरोग्य तपासणी करुन
मोफत निदान उपचार व संदर्भसेवा
देण्यात येतात. तसेच शाळा व
अंगणवाडीमधील कुपोषित बालके व बुद्ध्यांक आणि रेस्टींग हार्ट रेट घेतला जातो.
महाराष्ट्र अकस्मिक वैद्यकीय सेवा या कार्यक्रमांतर्गत पूर परिस्थिती आपत्कालीन
परिस्थिती, सर्पदंश, अपघात आदी कारणाने रुग्णांना सेवा
पाहिजे असल्यास 108 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्यामध्ये मोफत रुग्ण संदर्भसेवा व रुग्णालयीन
अॅम्बुलंस पुरविण्यात येते. जिल्हयात 11 रुग्णवाहिकेव्दारे नोव्हेंबर 2014
पर्यंत 1056 रुग्णांना या सेवेचा लाभ देण्यात आलेला आहे.
जिल्हा स्तरीय त्वरीत हस्तक्षेप केंद्रांतर्गत
0 ते 3 वर्ष वयोगटातील बाळांचे प्राथमिक अवस्थेत
तपासणी व निदान करुन तज्ञांव्दारे सल्ला दिल्या जातो. विशेष गरजा असलेल्या
मुलांना जीवनातील पुढील गुंतागुतींपासून संरक्षण मिळण्याकारीता मार्गदर्शन करणे
हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यांतर्गत अपंगत्वामुळे झालेले व्यंगत्व, आजारपण
कमतरता वाढ व विकास या चार गोष्टींवर भर दिला जातो.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात सर्व गरोदर
मातांनी प्रसूती पुर्व व प्रसूती पश्चात 42 दिवसापर्यंत तसेच नवजात बालकांस जन्मापासून
1 वर्षापर्यंत शासकीय रुग्णालयात मोफत औषधी आहार प्रसूतीसाठी लागणा-या संदर्भसेवा
मोफत पुरविण्यात येतात.यासाठी मोफत संपर्क फोन क्र.102 असा आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण
कार्यक्रम ऑगस्ट 2011 पासून सुरु झाला आहे. एनपीसीडीएस या कार्यक्रमा अंतर्गत
कॅन्सर हदय रोग, मधुमेह व पक्षाघात या रोगांच्या शोधकार्य गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत
करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत सर्व 30 वर्षावरील रुग्णांचा सहभाग घेण्यात
यतो. या रुग्णावर मोफत तपासणी व उपचार केल्या जातात. उपकेद्र पातळीवरुन संशयीत
मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्ण्
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे पुढील
तपासणी व उपचाराकरीता पाठविण्यात येतात. एमसीटीएस मध्ये मातांची नोंदणी करण्यापासून
ते प्रसुती नंतर 42 दिवसापर्यंत पाठपुरवठा करुन सेवा पुरविल्या जातात.त्याचप्रमाणे
नवजात बालकाचा पाठपुरवठा करुन त्यांची नोंदणी करुन देण्यात येणारे लसीकरण यांची
नोंद ठेवण्यात येते. राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत
बहिरेपणाची मशिनव्दारे ऑडिमोमॅट्रीक असिस्टंड व बोबडेपणा तोतरेपणासाठी स्पीच
थेरपीस्ट इत्यादी कर्मचा-यामार्फत तपासणी केल्या जाते. तसेच यासंबंधित असणा-या
आजाराचे उपचारही याठिकाणी केल्या जातात.
राजीव
गांधी जीवनदायी आरोग्य योजना 21 नोव्हेंबर 2013 रोजी सुरु झाली.
ही एक आरोग्य विमा योजना आहे. योजना महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली आहे. निवडक
जीवघेणे आजारावर उपचाराकरीता आर्थिक सहाय्य या योजनेतून प्राप्त होते. त्याकरीता
रूग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याच्याकडे पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक अथवा अन्न्पूर्णा अंत्योदय
अन्न योजनेचे पत्र धारक ( पांढरी शिधापत्रिकाधारक वगळता) या योजनांचे लाभार्थी या योजनेस पात्र असतील. एकूण
971 आजारांवर शस्त्रक्रिया आदी उपचारासाठी रुपये 1.5 लाख तर किडणी ट्रान्सप्लांटसाठी
रुपये 2.5 लाख प्रति कुटुंब प्रति वर्षाचे अनुदान मिळेल. याबाबत टोल फ्री क्रमांक
1800233220/155388 यावर संपर्क साधता येतो. जननी सुरक्षा योजने अंतर्गत एससी, एसटी व बीपीएलमधील गरोदर मातांना शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त
खाजगी रुग्णालयास रुपये 1 हजार 500 इतके अनुदान प्रसुतीपासून सात दिवसांच्याआत
प्रदान करण्यात येते. एचएसीसी या कार्यक्रमातर्गत 104 हा टोल
फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर मोफत आरोग्य विषयक सल्ला पुरविण्यात येतो,यात
वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ उपलब्ध असून
सल्ला पुरविण्यात येतो. तसेच शासकीय दवाखान्यामध्ये बाहेरुन औषधी लिहून दिल्यास
वर्धा व सातारा जिल्ह्यासंबंधी मोफत तक्रारही नोंदविता येते.
जीवन अमृत योजना यालाच ब्ल ऑन कॉल असे म्हणतात
. दि. 7 जानेवारी 2014 रोजी ही योजना सुरु झाली.
या योजनेअंतर्गत मोफत टोल फ्री क्रमांक
104 वर जिल्हा रक्तपेढीकडे दूरध्वनीवरुन रक्त मागणी झाल्यास तातडीने त्यास
प्रतिसाद देऊन लाभार्थ्यांना रक्त पुरवठा करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्यात
येते. या 24 तासांत सेवेकरीता वर्धा जिल्ह्यासाठी वर्धेतील पवन बहुउद्देशीय
शिक्षण व सामाजिक संस्था (मो.क्र. 9960444175) यांची निवड करण्यात आलेली आहे.
रक्तशुध्दीकरण विभाग 23 डिसेंबर 2013 ला किडणी फेल रुग्णांसाठी
सुरु करण्यात आला आहे. या विभागांतर्गत दररोज
गरजू रुग्णांचे डायलेसिस करण्यात येते. जिल्ह्यातील दरमहा 100 रुग्णांपेक्षा
जास्त रुग्णाना लाभ देण्यात येतो. रूग्णांबरोबरच परिसरही नीट नेटका असल्यास
प्रसन्न वातावरणाचा रूग्णाला लाभ होऊन रूग्ण लवकर बरा होतो. याच उद्देशाने कायापालट या योजनेंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट आर्वी
व ग्रामीण रुग्णालय, समद्रपूर येथे ही योजना राबविण्यात
येत आहे. या अंतर्गत इमारत सुशोभीकरण, परिसर स्वच्छता
आंतररुग्ण व बाह्य रुग्ण कक्ष सौदर्यींकरण पिण्याच्या पाण्याची सोय, खासगी कक्ष निर्मिती इत्यादी अंतर्भाव करण्याचे प्रस्तावित करण्यात
आलेले आहे.
सामान्य रुग्णालय वर्धा येथे राज्य शासनाकडून
एकून 10 बांधकामे जसे निवासस्थाने, शस्त्रक्रिया गृह, बाह्य रुग्ण विभाग, लिनन भांडार आदी बांधकामे सुरु
असून कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, देवळी येथील मुख्य इमारतीचे
बांधकाम हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पूर्ण झालेआहे. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील मुख्य इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
पुलगाव, भिडी, समुद्रपूर, वडनेर, कारंजा, सेलू येथे प्रत्येकी 30 खाटांचे,
हिंगणघाट 100 व आर्वी 50 असे खाटांचे रुग्णालये जिल्ह्यात उपलब्ध आहेत.
ही रुग्णालये शासनाची
असून मोफत उपचार, रोगांचे योग्य निदान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सोयी
सुविधा या ठिकाणी उपलब्ध् आहेत. भविष्यातही 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, आष्टीत
30 आणि देवळीत 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरु हेाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा उत्तम, दर्जेदार
असून रुग्णांनी योजनांचा लाभ घेऊन आरोग्याबाबत जागृती राहून वेळीच उपचार घ्यावेत.
-
श्याम
टरके, वर्धा
Comments