Skip to main content

Posts

  उदगीर तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश पुरी यांना जाहीर SURESH PURI औरंगाबाद, दिनांक 06: उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सन २०१९-२०२० चे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील जनसंवाद व वृत्तपत्रविभागाचे प्रा. सुरेश पुरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत दहा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात उत्कृष्ट वार्ता गटामध्ये‍ प्रथम पुरस्कार दैनिक सकाळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बातमीदार अविनाश काळे यांच्या 'शेतमजूरी करुन शिक्षणासाठी घेतला फोन' या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ प...

जिल्ह्यात 780 रुग्णांवर उपचार सुरू, आज 72 रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि.09 (जिमाका) :   औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 72 कोरो नाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधि तांची संख्या 2141 झाली  आहे. यापैकी 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 780 रुग्णांव र उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्म‍िला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1),   बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक,...

जिल्ह्यात 737 रुग्णांवर उपचार सुरू, आज 45 रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि.08 :   औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 45 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2065 झाली आहे. यापैकी 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 104 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 737 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवशंकर कॉलनी (1), बौद्ध नगर (1), पीर बाजार, उस्मानपुरा (8), पोलिस क्वार्टर, तिसगाव (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (1), सातारा परिसर (3), पद्मपुरा (1), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (1), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), मजनू हिल, दमडी मोहल्ला (1), ज्युबली पार्क (1), गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (2), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (5), सादाफ कॉलनी, कटकट गेट (2), पुंडलिक नगर (1), विद्या निकेतन कॉलनी (2), भोईवाडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1),एन-चार, सिडको (1), कैलास नगर (1), गणेश नगर, पंढरपूर परिसर (1), अन्य   (2), देवशी पिंपळगाव, गंगापूर (1), सावरखेडा, सोयगाव (1) ...

जिल्ह्यात 1224 कोरोनामुक्त, 692 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 07 :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 692 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 70 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2020 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भावसिंगपुरा (1),  बजाजनगर, वाळूज (1),  हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन  सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्त‍िया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  9 लक्ष 75 हजार रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस औरंगाबाद, दिनांक 28-   नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन   नऊ लक्ष 75 हजार 136 रुपये असलेला धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.    कोविड -19 कोरोना साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता  निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी  यांना निधी देण्याचे आवाहन केले. त्या नुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातील एका दिवसाचे वेतनाचा  नऊ लक्ष 75 हजार 136 रुपयांचा धनादेश श्री.चव्हाण यांच्याकडे ...

कला, क्रीडा, पर्यटनालाअधिक चालना देणार : अदिती तटकरे

औरंगाबाद, दिनांक 9 :  औरंगाबादेतील कला, क्रीडा आणि पर्यटनाला अधिक चालना देऊन पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही आज उद्योग, क्रीडा, पर्यटन आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपट गृहात यशवंतराव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, एमजीएमचे अंकुशराव कदम, सत्कारमूर्ती सुमित्रा भावे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल,  चंद्रकांत कुलकर्णी, निलेश राऊत व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ऐतिहासिक औरंगाबादची ओळख जपण्यासाठी शहरातील दरवाजांचे संवर्धन,  वेरूळ महोत्सव या बाबींवर योग्य अंमलबजावणी करण्यात येईल. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याबरोबरच येथे कला, क्रीडा आणि...

सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवाराची निवड करा – बलदेव सिंह

☯️राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा ☯️नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद , दिनांक  25  : सर्वसमावेशक ,  नैतिकदृष्ट्या निवडणूक पार पाडण्यासाठी पारदर्शी ,  निर्भय वातावरणात मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न भारत निवडणूक आयोग करत असते. तरी मतदारांनी सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवारांची निवड करावी ,  असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज केले. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज  शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिंह होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ,  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ,   पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद ,  विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल ,...