v 10 हेक्टरवर 6250 लावणार रोपे
v जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून गोगा बाबा टेकडी परिसर अजून हिरवागार करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या पुढाकरातून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून वनरोपन संवर्धन दर्जा कमी असलेल्या वनांत पुर्नरोपन करण्याच्या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे दहा हेक्टर जागेवर रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या रोप लागवडीत देशी प्रजातींना महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, पापडा, बांबू, आंबा, रामकाठी बाभूळ, हिवर, निम, शिसू, खैर, पळस, आमलतास, शिरस आदी प्रजातीचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे.
या रोपांचे तीन वर्ष संवर्धन शासनामार्फत करण्यात येणार असून वृक्षांच्या संवर्धनासाठी तारांचे कुंपन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील अधिकारी कास पठार येथे भेट देऊन तेथील विविध प्रजातींची लोभनीय फुलांची रोपे, बी आणणार असल्याचेही ते म्हणाले.
******
Comments