Skip to main content

Posts

Showing posts from December, 2017

शरद पवारांवरील चव्हाण लिखित पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करावे-  डॉ. मनमोहन सिंग

              औरंगाबाद,दि.23- आदरणीय मित्र, उत्तम सहकारी, जगभरात कर्तृत्त्वाने राजकारणात ठसा उमटविणारे, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी पुढाकार घेणारे, देशासमोरील संकटे आदर्शवत पद्धतीने हाताळणारे  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट इनिग्मा’ या चरित्रात्मक पुस्तकाचे सर्वांनी वाचन करायलाच हवे, असे प्रतिपादन माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आज केले.  शहरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) च्या रुक्मिणी सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते. माजी कृषीमंत्री तथा पद्मविभूषण शरद पवार, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. सिंग म्हणाले, औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा नगरीत येऊन मला आनंद झाला. जुने मित्र शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावरील पुस्तकातून अनेक बाबी वाचकांच्या समोर येतील.

सामाजिक न्याय चित्ररथाचे नवल किशोर राम यांच्याहस्ते उद्घाटन

       औरंगाबाद,दि.21-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले.           जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून श्री. राम यांनी उद्घाटन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनेची उद्दिष्टे आदींबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणा

दुधड झाले शेततळ्यांचे गाव

पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल… '' मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ . पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे . विकासाचा भाग म्हणून   प्रत्येक अधिका - यांनी एक गाव दत्तक घ्यावे , असा त्यांनी प्रयोग केला . त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली . शेतक - यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत . सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा . दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक - यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा . शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच !  '' - डॉ . विजयक