शाश्वत पाण्याचा आधार... जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाची, महत्त्वाकांक्षी आणि कमालीची अशी सर्वांच्याच उपयोगाची महत्त्वपूर्ण अशी योजना. ही योजना आता योजना राहिली नसून लोकचळवळ बनली आहे. वर्धा जिल्ह्यातील 214 गावांमध्ये अभियानांतर्गत कामे झाली. आता केवळ 205 कामे शिल्लक आहेत; तीही प्रगतीपथावर आहेत. एकूणच लोकचळवळीतून जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून गावच्या शिवारातील पाणी गावात साठवून भूजल पातळीत वाढ होते आहे. जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तयार केलेली ही योजना राज्यासह जिल्ह्याला अधिकच लाभदायी ठरली आहे. आता ही योजना शेतीसाठी शाश्वत असा आधारच आहे. जलयुक्त शिवार अभियानाने शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून दिले. शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात जलसंधारण, लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट नालाबांध, खोलीकरण, साखळी सिमेंट नालाबांध, कृषी विभागाकडून नालाखोलीकरण व ढाळीचे बांध, सामाजिक वनीकरणकडून झाडांची ...