वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’ वि दर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे . नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते . पट्टेदार वाघ , हरिण , साळिंदर , नीलगाय , अस्वल , मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात . त्यांचे व वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल . निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच , असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय . येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभ...