Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दिनांक 2 ( Link ) :  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. बैठकीत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1995 अन्वये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. मार्च महिन्यात शहर हद्दीत चार तर ग्रामीण भागात 13 प्रकरणे घडली. यात दोन बलात्कार, पाच विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ इतर पाच प्रकरणांचा समावेश आहे. तर एप्रिल महिन्यातील सात प्रकरणांमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग आणि चार इतर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी दिली. या गुन्ह्यांमध्ये वाढ होणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीस पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोंखे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. ******  

गोगाबाबा टेकडी बनवणार ऑक्सिजन हब, झकास पठार ! - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

v    10 हेक्टरवर 6250 लावणार रोपे v    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य   औरंगाबाद, दिनांक 2  : शहरातील भावसिंगपुरा परिसरातील गोगाबाबा टेकडीवर जागतिक पर्यावरण दिनी (05 जून) सुमारे 6 हजार 250 देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. यामुळे हा भाग ऑक्सिजन हब बनेल. त्याचबरोबर साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवरच विविध फुलांच्या रोपांची लागवड टेकडी परिसरात करून हा भाग झकास पठार करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाचा असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सांगितले. तसेच नागरिकांनी 5 जून रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या सर्व नियमावलींचे पालन करत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून गोगा बाबा टेकडी परिसर अजून हिरवागार करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या पुढाकरातून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून वनरोपन संवर्धन दर्जा कमी असलेल्या वनांत पुर्नरोपन करण्याच्या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे दहा हे

सीबीएससी बारावी परीक्षा रद्द

मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद मुंबई दि 1: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून 12 वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दहावी व बारावी सारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते.  राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच  घेतला आहे.

कोरोना उपचारात दिलासा !

कोविड १९ :   खासगी रुग्णालयांनाअवास्तव दर लावता येणार नाहीत रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. १ :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी  आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली.  यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खास गी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल

जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू

                                                                                                                                                                                                                              01062021 औरंगाबाद, दिनांक 01   :   औरंगाबाद जिल्ह्यात आज 408 जणांना (मनपा 136, ग्रामीण 272) सुटी   देण्यात आली. आजपर्यंत 136463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142889 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3214 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (67) सातारा परिसर 2, बीड बायपास 2, गारखेडा 1, शिवाजी नगर 2, कांचनवाडी 2, अजब नगर 1, मिटमिटा 1, पेठे नगर 1, एन-12 येथे 1, एन-5 येथे 2, हर्सूल 3, संत ज्ञानेश्वर नगर 1, आंबेडकर नगर 1, चेतना नगर 2, सारा वैभव 1, सुरेवाडी 1, विश्रांती नगर 1, संभाजी कॉलनी 1, एन-4 येथे 1, पुंडलिक नगर 1, इंदिरा नगर 1, माऊली नगर 1, सातारा पोलीस स्टेश