Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

कला, क्रीडा, पर्यटनालाअधिक चालना देणार : अदिती तटकरे

औरंगाबाद, दिनांक 9 :  औरंगाबादेतील कला, क्रीडा आणि पर्यटनाला अधिक चालना देऊन पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही आज उद्योग, क्रीडा, पर्यटन आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपट गृहात यशवंतराव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, एमजीएमचे अंकुशराव कदम, सत्कारमूर्ती सुमित्रा भावे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल,  चंद्रकांत कुलकर्णी, निलेश राऊत व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ऐतिहासिक औरंगाबादची ओळख जपण्यासाठी शहरातील दरवाजांचे संवर्धन,  वेरूळ महोत्सव या बाबींवर योग्य अंमलबजावणी करण्यात येईल. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याबरोबरच येथे कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्