नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता झाली. संत एकनाथांची महती वैष्णवांना आहेच. संत एकनाथांच्या कार्याची महती पुस्तकातून कळतेच, परंतु प्रत्यक्षातील अनुभूती त्याहून वेगळीच असते. यावेळीच्या नाथ षष्ठी सोहळ्याचा हा वृत्तांत… औरंगाबादहून पैठणच्या दिशेने आम्ही दुपारी दोन वाजता निघालो. काही दिंड्या औरंगाबादच्या दिशेने परतत होत्या. साडेतीनच्या सुमारास पैठणमध्ये पोहोचलो. काही दिंड्या मंदिर परिसरात होत्या. यावेळी सर्वाधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या होत्या. या दिंड्यातील वारकरी आपापल्या पालात दिसत होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलेला होता. यांच्यातून वाट काढत नाथांच्या दर्शनासाठी थेट मंदिराच्या मंडपात आम्ही प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं. नाथांचा प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. नाथांच्या थेट समाधी दर्शनाने आम्ही तर धन्य झालो. हा क्षण म्हणजे मौलिकच. त्याची तुलना कोणत्याही ऐश्वर्याशी होऊ शकत नाही. दर्शनानंतरची अनुभूती अवर्णनीयच. सूर्यास्तानंतर कालाहंडी फोडण्यापूर्वी नाथांचे वंशज रघुनाथ बुवा महाराज गोसावी यांची पालखी मंदिरात येते. नाथांच्या समाधी मंदिरास...