Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

जुने ते सोनेच

           आम्ही उच्च प्राथमिक शाळेत आल्याचं कळत होतं, तेव्हा गोविंदा, मिथुन,देवानंद, सनी, आदित्य पंचाली, अमरीश पुरी, डायनी, अजय देवगण, अमिताभ, करिश्मा, माधुरी, दिव्या भारती, काजोल अशी नावे कळायला लागली. त्याचबरोबर शहरातील महावीर, रघुवीर, नाझ, फिरोज, तलरेजा, अनुसया चित्रपट गृह आणि दोनेक व्हीडिओ पार्लर. http://www.universalstudioshollywood.com                पिचर आवडायचा. हो आम्ही लहानपणी पिचरच म्हणत. चित्रपट सुरु झाला, की फिचर फिल्म असं नाव यायचं. म्हणून आम्ही मित्र यावर वादही घालत. पोस्टर्सवरही तेच लिहिल्याचे आम्हाला ठाम माहीत; तरीही आम्ही या फिचरचा अपभ्रंश करून पिचर हा शब्दच वापरत. जो आमच्या बोलीत रूढ झाला, आजही आहे. पिचरला घरातल्यांचा विरोध. पिचर पाहणे म्हणजे निव्वळ वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा वाया घालवणे असा आमच्याकडे ठाम समज. त्यामुळे लहानपणापासून आवड असूनही या क्षेत्रात अधिक रस घेता आला नाही.              गांधी विद्यालय शाळा (मढी) आणि त्यातील शिक्षण याबाबत सांगायचे तर आमच्यासाठी असा दंडक,की एखादा दिवस शाळा बुडाली म्हणजे जणू काही महाप्रलय, भूकंप अशी काहीतरी मोठी आपत्ती आमच