Skip to main content

Posts

Showing posts from September, 2014

विज्ञानयुगातील पितृमोक्ष अमावस्या

सौजन्य-http://images.jagran.com गडचिरोली               पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. सर्वांना ते मुखपाठ आहे. परंतु आज सर्वपितृमोक्ष अमावस्या असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कारणही तसंच आहे. सकाळी सकाळी वृत्तमानपत्रे हाती पडलीे आणि कळलं. पहिल्या पानावर उद्याचा अंक नाही. असं ठळकपणे सर्व वृत्तपत्राच्या अगदी सुरवातीला पाहिल्या कॉलममध्ये वाचकांसाठी सूचना होती. तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही पक्ष पंधरवाडयामुळे पक्षापक्षांचा मिलाप होत नाहीय. पिंडेला कावळा शिवत नाहीय, असं पाहायला, वाचायला मिळालं. त्यामुळे अमावस्याची धास्तीच मनात भरलेली. त्यातच जिल्ह्यात प्रशासनाला कलेक्टरांनी सुटी घोषित केलेली (आम्ही कामावर हजर होतो हं.. कलेक्टर साहेबांसह, कदाचित निवडणुकीमुळे म्हणा).             प्रशासनलाही पिढयान् पिढ्या चालत आलेला आदेश घोषित करावा लागतो (अन्यथा कर्मचा-यांच्या क्रयशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असते). माध्यमंही त्याच पठडीतली म्हणायला का हरकत आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहे...