राष्ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी आम्ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्ही.... म्हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्त करून जातो , ही इथं आल्यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्याची सोयही उत्तम आहे. जेवणाचीही व्यवस्था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्ट. उन्हाळयात तर याठिकाणी प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्य असं ठिकाण आहे. (व्हीडिओ सौजन्यः चंद्रकांत पाटील)