Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  9 लक्ष 75 हजार रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस औरंगाबाद, दिनांक 28-   नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन   नऊ लक्ष 75 हजार 136 रुपये असलेला धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.    कोविड -19 कोरोना साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता  निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी  यांना निधी देण्याचे आवाहन केले. त्या नुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातील एका दिवसाचे वेतनाचा  नऊ लक्ष 75 हजार 136 रुपयांचा धनादेश श्री.चव्हाण यांच्याकडे ...